वाकड, ता. १० ः ‘केंद्र सरकार संविधान बदलणार असल्याची खोटी अफवा काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काही लोक पसरवीत आहेत. मात्र आम्ही ते होऊ देणार नाही. आम्ही संविधान आणखी मजबूत करणार आहोत. त्यामुळे भाजपच्या विकासाला मत द्या,’ असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी (ता. १०) वाकड येथे केले.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीतील प्रभाग २५ मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे, श्रुती वाकडकर, रेश्मा भुजबळ व कुणाल वाव्हळकर यांच्या प्रचारार्थ वाकडमधील सम्राट चौकात आयोजित कोपरा सभेत आठवले बोलत होते. ते म्हणाले, ‘‘एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत आमची युती होऊ शकली नाही. तरी आम्ही सर्वजण एकच आहोत. आम्हाला चिन्ह नसल्याने कमळ चिन्हावरच लढतोय.’’
कलाटे म्हणाले, ‘‘अनेक वर्षांपासून आमचे रहिवाशांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अहोरात्र त्यांच्या सेवेसाठी झटतोय. वाकडचे प्रथम नगरसेवक म्हणून माझे वडील, त्यानंतर आई आणि मीही प्रतिनिधी म्हणून जनतेची नि:स्वार्थ सेवा करीत आहे. करोना काळातही दोन महिने रेशन पुरविले. वैद्यकीय व विविध स्वरुपाची मदत केली. मागील काळात प्रभागाचा सूनियोजित विकास साधत विविध आरक्षणे विकसित केली आहेत. या पुढेही प्रभागाचा सर्वांगीण विकास साधणार आहे.’’
---
फोटो
84096
सम्राट चौक, वाकड ः कोपरा सभेत (डावीकडून) अभिवादन करताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या समवेत उमेदवार राहुल कलाटे, कुणाल वाव्हळकर, उमेदवार श्रुती वाकडकर, रेश्मा भुजबळ आदी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.