पिंपरी-चिंचवड

कासारसाई धरणातील पाणी दूषित, ग्रामस्थ आक्रमक

CD

हिंजवडी, ता. ४ : कासारसाई धरणालगतचे रिसॉर्ट्स व पर्यटन व्यवसायिकांचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट कासारसाई (ता.मुळशी) धरणात सोडले जात आहे. याशिवाय मत्स्यपालनामुळेही धरणातील पाणी दूषित होत असल्याचा आरोप कासारसाईच्या ग्रामस्थांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर संबंधित मासेमार आणि रिसॉर्ट व्यावसायिकांवर तत्काळ कारवाई करावी, अन्यथा मोठे आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
कासारसाई धरणातील दूषित पाण्याबाबत उपसरपंच ललित शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली भैरवनाथ मंदिरात ग्रामसभा झाली. त्यामध्ये माजी सरपंच ज्ञानेश्वर शेडगे यांनी ठराव मांडला. ग्रामस्थांकडून हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्यास गुलाब लेणे यांनी अनुमोदन दिले. जलजीवन मिशनअंतर्गत सुमारे ५ कोटी रुपये खर्चून कासारसाई गावासाठी पाणीपुरवठा योजना उभारण्यात आली आहे. मात्र, धरणाचे पाणी मानवी आरोग्यास अपायकारक बनले असून साथीचे आजार पसरण्याचा धोका वाढला आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.


काय आहे तक्रार ?
- धरणाच्या पाण्यात माशांना दररोज पाचशे ते सहाशे किलो खाद्य टाकले जाते.
- त्यामध्ये मृत कोंबड्या, चिकन दुकानातील मांसाचे तुकडे, मृत माशांचा वापर
- पाणी कमालीचे काळवंडून दुर्गंधी, पाण्याचा रंग व चव बदलली

आरोग्याला धोका
कासारसाई धरणातील पाण्यावर कुसगाव, कासारसाई, नेरे ग्रामस्थ अवलंबून आहेत. पिंपरी चिंचवड शहरालाही नदी, ओढ्यांद्वारे तसेच मावळातील साळुंब्रे, गोडुंब्रे, खालुंब्रे या व अन्य गावांना कालवे आणि विहिरींना हे पाणी पुरवले जाते. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी, अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.

शासनाकडून नेमणूक
मत्स्यपालनासाठी शासनाच्या मत्स्य विभागाकडून निविदा प्रक्रिया राबवून ठेकेदारांची नेमणूक केली जाते. ठेकेदारामार्फत मत्स्यपालन व त्याची विक्री केली जाते. मात्र, खर्चात बचत करण्याकरिता तसेच माशांची जलद वाढ होऊन वजन भरण्यासाठी अशा प्रकारचे टाकाऊ खाद्य दिले जात आहे.

धरण क्षेत्र आणि त्यालागतचा सर्व परिसर पाटबंधारे खात्याच्या अख्त्यारीत येते. तेथील बेकायदा बाबींवर ते कारवाई करतील. मात्र, धरणालगतच्या पीएमआरडीए क्षेत्रात अतिक्रमणे होत असतील अथवा व्यावसायिकांकडून धरणात सांडपाणी सोडले जात आहे का ? याची पाहणी केली जाईल. नागरिकांनी देखील कुठलाही गैरप्रकार आढळल्यास तक्रार करावी. त्याची दखल तत्काळ घेतली जाईल.
- योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए

ग्रामस्थांचा आरोप बिनबुडाचा आहे. मुळात मत्स्य पालनासाठी व्हेज राईस मिल अथवा सोयाबीन हे खाद्य दिले जाते. हा व्यवसाय राज्य शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत केला जातो.
- व्यवस्थापक, ठेकेदार (मत्स्यपालन)

कसारसाईची लोकसंख्या सुमारे दहा हजार आहे. दररोज दर माणसी ५५ लिटर पिण्याचे पाणी लागते. मात्र, मत्स्यपालनासाठी दिल्या जाणाऱ्या खाद्यामुळे पाणी काळवंडले असून उग्र वास येत असल्याने शुद्ध पाणी देऊनही नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत आम्ही तक्रार केली आहे.
- सुभाष लिंबरकर, ग्रामपंचायत अधिकारी, कासारसाई

मत्स्यपालन हा विषय पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येतो. त्यामुळे ठेकेदार माशांना कुठले खाद्य देतो ? याबाबत शहनिशा करून त्यांनी कारवाई करुन खबरदारीच्या सूचना दिल्या पाहिजेत. मात्र, धरणालगतचे हॉटेल व रिसॉर्ट व्यावसायिक सांडपाणी थेट सोडत असतील तर त्यांच्यावर आमच्याकडून कारवाई केली जाईल.
- नवनाथ अवताडे, उपप्रादेशिक अधिकारी, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (पुणे २)

कठोर पावले उचला
आम्ही ठेकेदारांना वारंवार पत्र दिले आहे. वरिष्ठ विभाग कारवाई करणार आहे. मात्र, या गावातील सांडपाणी वाहिन्या देखील थेट गावातून जाणाऱ्या कालव्यांना बेकायदा जोडल्या गेल्या आहेत. कारखाना परिसरात वाढलेल्या सोसायट्या, लोकवस्त्यांचे देखील सर्व प्रकारचे पाणी थेट कालव्यात जाते. तेच पाणी शेती आणि पिण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे ग्रामपंचायतींनी देखील कठोर पावले उचलावीत, असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पिकनिक अभिनेत्रीच्या जीवावर बेतली ! कुटूंबासहित हत्या करून फार्महाऊसवर गाडलं; 13 वर्षांनी मिळाला न्याय

FAFO Parenting: फार झाले मुलांचे लाड! आता व्हा FAFO आई-वडील; जेन अल्फा पॅरेंटिंगमधील नवा ट्रेंड व्हायरल

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा परिषदच्या 73 जागांसाठी उद्या मतदान

प्राजक्ता माळीने बनवला कोकणातल्या घराघरात बनणारा खास पदार्थ; व्हिडिओ पाहून अमृता खानविलकर म्हणते-

Islamabad Blast: मोठी बातमी! इस्लामाबादमध्ये नमाज दरम्यान आत्मघाती बॉम्बस्फोट; ५० हून अधिकांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT