पिंपरी-चिंचवड

माण-हिंजवडी, मारुंजीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

हिंजवडी, ता. ७ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी हिंजवडी-माण गण व गटात शनिवारी (ता. ७) मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली. आयटीयन्स, सोसायट्यांमधील मतदारांसह स्थानिकांचा उत्स्फूर्त
प्रतिसाद मिळाला. सकाळच्या तुलनेत दुपारनंतर मतदार केंद्रावर रांगा दिसल्या.
सकाळपासूनच काही मतदान केंद्रांवर तांत्रिक अडचणी व मतदार याद्यांतील त्रुटींमुळे गोंधळ झाला. भोईरवाडी बूथ क्रमांक १५ वर सव्वा दोनच्या सुमारास मतदान यंत्राचे बटण अडकून राहिल्याने थोडा वेळ मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली. दुरुस्तीनंतर मतदान सुरू झाले. अनेक मतदान केंद्रांवर मतदार याद्यांमध्ये घोळ आढळला. काही ठिकाणी मतदारांचे पत्ते गायब होते, तर काही ठिकाणी दुबार नावे आढळली. नावात साधर्म्य असल्याने चुकीच्या मतदारांनी मतदान केल्याचेही उघड झाले. मतदानापासून वंचित राहिल्याने मूळ मतदारांनी संताप व्यक्त केला.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदान केलेल्या काही मतदारांची नावे यावेळी मतदार यादीत नव्हती. त्यामुळे त्यांच्यात नाराजी दिसून आली. मतदान कार्ड असून तसेच उमेदवारांकडून स्लीप मिळूनही मतदान केंद्रावरील यादीतील नाव जुळत नसल्याने अनेकांना मतदानास मज्जाव करण्यात आला. अखेर बीएलओकडून हमीपत्र घेऊन त्यांना मतदानाचा हक्क बजावावा लागला. माण-हिंजवडी परिसरात बोगस मतदानाचे प्रकार घडल्याचे आरोप विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी केले. मारुंजीतील मतदान केंद्राबाहेर दिवसभर कार्यकर्ते व मतदारांची उत्स्फूर्त गर्दी पाहायला मिळाली.
माणमधील जुनी व नवीन माण जिल्हा परिषद शाळा, भोईरवाडी जिल्हा परिषद शाळा, आय-ट्रेंड सोसायटी व मेगापॉलिस अशा चार मतदान केंद्रांवरील एकूण १५ बूथद्वारे मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. जुनी व नवीन माण शाळेतील केंद्रांवर ओझरकरवाडी, माण गावठाण व बोडकेवाडी परिसरातील मतदान झाले, तर भोईरवाडी शाळेत भोईरवाडी व आजूबाजूच्या सोसायट्यांतील मतदारांनी हक्क बजावला. तांत्रिक अडचणी व मतदार याद्यांतील त्रुटी असूनही दिवसभर मतदान प्रक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी निवडणूक प्रशासन व पोलिस यंत्रणा सतर्क होती.

---
मी मूळची पश्चिम बंगालची आहे. वर्षभरापूर्वीच मी मतदार यादीतील नाव इकडे नोंदविले. त्यानंतर लोकसभेला आणि विधानसभेला मी मतदान केले. यावेळी ओळखपत्र असूनही मला मतदान करण्यापासून अडविण्यात आले. अखेर बिएलओकडून हमीपत्र घेऊन मी मतदान केले, मात्र सर्वसामान्य मतदारांना असा मनःस्ताप होणे चुकीचे आहे
- शबरी चक्रवर्ती, ज्येष्ठ मतदार, स्प्लेंडर सोसायटी, माण
---
माण : जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्रावर झालेली मतदारांची गर्दी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

औद्योगिक क्षेत्रात कोणतीही गुंडगिरी किंवा बेकायदेशीर खंडणी खपवून घेतली जाणार नाही, देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट निर्देश

U19 World Cup: 'अजून खूप दूर जायचंय...' वैभव सूर्यवंशीची विश्वविजेता झाल्यानंतरची पोस्ट चर्चेत

Gangapur Accident News : शिवपूर शिवारात भीषण अपघात, भरधाव कंटेनर-आयशरची समोरासमोर धडक; दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये CTET परीक्षा केंद्रावर महिलांना मंगळसूत्र काढण्यास सांगितले; देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

Chandrapur : भाजपकडून ठाकरेसेनेला महापौरसहित पदांची ऑफर, आधी कुणाचा महापौर? प्रश्नावर चर्चा थंडावली

SCROLL FOR NEXT