पिंपरी-चिंचवड

वाकडच्या श्रीया मानेच्या कष्टांना यशाचे फळ

CD

बेलाजी पात्रे ः सकाळ वृत्तसेवा
वाकड, ता. ११ : राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेत वाकड येथील श्रीया दत्तात्रय माने हिने पहिल्याच प्रयत्नात संपूर्ण राज्यात सर्वसाधारण यादीत तृतीय क्रमांक पटकावत देदिप्यमान यश संपादन केले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिची उपसंचालक (कृषी) वर्ग-१ पदावर निवड निश्चित मानली जात आहे. राज्यातील हजारो स्पर्धकांमधून तीने मिळवलेले हे यश तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
श्रीया हिने २०२४ मध्ये एमपीएससी पूर्वपरीक्षेची तयारी सुरू केली. परीक्षांबाबतची अनिश्चितता, स्पर्धेची तीव्रता आणि अभ्यासाचा प्रचंड आवाका या सर्व आव्हानांवर मात करत तिने आत्मविश्वासाने पूर्वपरीक्षा उत्तीर्ण केली. मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी त्यांनी दररोज १२ तासांहून अधिक अभ्यास करून स्वतःला झोकून दिले. विशेष म्हणजे, एमबीए (फायनान्स)च्या सत्र परीक्षांना दुय्यम स्थान देत तिने पूर्ण लक्ष एमपीएससीवर केंद्रित केले.
मुख्य परीक्षेनंतर जवळपास आठ महिन्यांची प्रतीक्षा ही देखील तितकीच कसोटीची होती. मुलाखतीसाठी निवड झाल्यानंतर श्रीया हिने सामाजिक माध्यमांपासून दूर राहत ‘मॉक इंटरव्ह्यू’, वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण अभिप्रायांच्या आधारे स्वतःची सर्वांगीण तयारी केली. मुलाखतीच्या तारखा जाहीर झाल्या. त्याचवेळी तिची एमबीए तृतीय सत्राच्या परीक्षा सुरू होत्या. दुहेरी जबाबदारी पार पाडताना श्रीया हिने दोन्ही आघाड्यांवर उत्कृष्ट कामगिरी केली. शिस्तबद्ध नियोजन, चिकाटी आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांचे फलित म्हणून आज त्यांचे हे उज्ज्वल यश राज्यासमोर आले आहे.


शैक्षणिक, प्रशासकीय परंपरा लाभलेल्या कुटुंबातून श्रीया येते. तिचे वडील प्रा. दत्तात्रय माने हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक आहेत, तर आई शुभांगी माने या राज्य शासनाच्या १९९६ बॅचच्या महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील वर्ग-१ अधिकारी आहेत. सध्या बालभारती, पुणे येथे त्या सहसंचालक (वित्त) म्हणून कार्यरत आहेत. कुटुंबियांचे मार्गदर्शन आणि नैतिक पाठबळ हे त्यांच्या यशामागील भक्कम आधारस्तंभ ठरले.


परीक्षेमुळे मित्रमैत्रिणींसोबतचे क्षण, सहली आणि कौटुंबिक समारंभ यापासून मला दूर राहावे लागले. मात्र, आज मागे वळून पाहताना प्रत्येक त्याग सार्थकी लागल्याची जाणीव होते. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आणि मार्गदर्शन करणाऱ्या वरिष्ठांचे मी मनःपूर्वक आभार मानते.
- श्रीया माने, उत्तीर्ण परीक्षार्थी, एमपीएससी
PNE26V94814

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh PM salary: भारत VS बांगलादेश PM! कोण घेतो जास्त पगार? कुणाला मिळतात ‘राजेशाही’ सुविधा? सत्य जाणून घ्या...

Nashik Rural News : पतीला वाचविताना महिलेचा दुर्दैवी अंत; विहिरीजवळ विजेचा धक्का बसला अन् क्षणात सुखी संसार झाला उद्ध्वस्त!

T20 World Cup: पांड्या-किशनचा नामिबियाला दणका; भारताचा विक्रमी विजय

Kolhapur Municipal Revenue : आर्थिक वर्ष संपत आले तरी महापालिकेचे उत्पन्न ७२ टक्क्यांवर; आताच उद्दिष्टापेक्षा १७९ कोटींची तूट

Mumbai Fire: मुंबईत थरार! ४५ मजली भव्य इमारतीत भीषण आग, काही मिनिटांत खळबळ! व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT