पिंपरी-चिंचवड

पिंपरीत आज पुन्हा आढळले कोरोनाबाधित; आनंदनगर, सांगवी, भाटनगर, किवळे परिसरातील रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शहरात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत आणखी 25 जणांची भर पडली.  त्यामुळे सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत एकूण रुग्ण संख्या 379 झाली. सर्व रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम व भोसरी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरात रविवारी (ता. 24) आढळलेले रुग्ण आनंदनगर-चिंचवड, सांगवी, थेरगाव भागातील होते. आजही (सोमवार, ता. 25) आनंदनगर, सांगवीसह भाटनगर पिंपरी, किवळे परिसरातील 25 रुग्ण आढळले आहेत. त्यात 14 पुरुष व 11 महिलांचा समावेश आहे. तसेच, पुण्यातील एक पुरुष व एका महिलेचा रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आढळला आहे, तर  येरवड्यातील एका महिलेचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

सध्या रुग्णालयात शहरातील 202 व पुण्यातील 29 जणांवर उपचार सुरू आहेत. तर, पुण्यातील रुग्णालयांत शहरातील 23 रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, आज दुपारपर्यंत आलेल्या रिपोर्टनुसार आनंदनगर परिसरातील रुग्णांचाही समावेश आहे. आजही येथील नागरिकांची कोरोनापूर्व तपासणी मोबाईल लॅबद्वारे केली जात आहे. आजपर्यंत शहरातील सर्वाधिक रुग्ण आनंदनगर परिसरात आढळले आहेत. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आजपर्यंत शहरातील 379 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 222 पुरुष व 157 महिलांचा समावेश आहे. यात सर्वाधिक तरुण आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

शहरातील एकूण पॉझिटिव्ह 402

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम व भोसरी रुग्णालयांत उपचार घेणारे 379 रुग्ण आहेत. मात्र, पिंपरी चिंचवड शहरात राहणारे व पुणे शहरात उपचार घेणारे 23 रुग्ण आहेत. त्यांचे मिळून शहरातील एकूण रुग्ण संख्या 402 होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, शेकाप कार्यकर्ते अन् शिवसैनिक भिडले

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT