Crime Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : रेमडेसीव्हीर इंजेक्शन काळ्या बाजाराने विकणारे दोघे अटकेत

कोरोना उपचारावरील रेमडेसीव्हीर इंजेक्शन काळ्या बाजाराने विकणाऱ्या दोघांना पिंपरी - चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - कोरोना उपचारावरील रेमडेसीव्हीर इंजेक्शन काळ्या बाजाराने विकणाऱ्या दोघांना पिंपरी - चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली आहे. आरोपींमध्ये एका नर्सचा समावेश असून तिच्यावरही गुन्हा दाखल आहे.

राहुल कल्याण बोहाळ (वय २८), विजय गणेश शिरसाठ (वय २९, दोघेही रा. विजयनगर, काळेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे असून नर्स ज्योती कोकणे-लगड हिच्यावर गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी , एक महिला काळ्या बाजाराने रेमडेसीव्हीर इंजेक्शन विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस व अन्न-औषध प्रशासनाच्या पथकाने बनावट ग्राहक तयार करून ज्योती हिच्या मोबाईलवर संपर्क साधला.

त्यानंतर काही वेळातच आरोपी राहुल व विजय यांनी ग्राहकाच्या मोबाईलवर संपर्क साधून इंजेक्शन उपलब्ध असल्याचे सांगून एकाची किंमत चाळीस हजार याप्रमाणे दोन इंजेक्शनची ऐंशी हजार रुपये सांगितले. हे इंजेक्शन हवे असल्यास विजयनगर येथील क्रांती चौकात येणार असल्याचेही सांगितले. त्यानुसार सोमवारी (ता. २६) रात्री सव्वा आठच्या सुमारास सापळा रचून राहुल व विजय यांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून दोन इंजेक्शन ताब्यात घेतले.

हे इंजेक्शन कुठून आणले याबाबत विचारले असता पिंपरीतील नेहरूनगर येथील संतोषी माता चौकातील आयुष रुग्णालयात नर्स म्हणून कामाला असलेल्या ज्योती कोकणे-लगड हिच्याकडून आणल्याचे आरोपींनी सांगितले. त्यांच्याकडून दोन इंजेक्शनसह एक दुचाकी जप्त केली. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : सदाशिव पेठेत जुन्या वादातून एमपीएससी करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT