Aaditya and Apurv Sakal
पिंपरी-चिंचवड

दोन सख्ख्या भावांचा कोरोनाविरुद्धचा लढा अपयशी

ते दोघे भाऊ. आदित्य आणि अपूर्व. आदित्यचा विवाह दीड वर्षांपूर्वी झालेला. अपूर्वचा येत्या दिवाळीत ठरलेला. दोघांसह आई-वडील व आदित्यच्या पत्नीला संसर्ग झालेला.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - ते दोघे भाऊ. आदित्य (Aaditya) आणि अपूर्व. (Apurv) आदित्यचा विवाह दीड वर्षांपूर्वी झालेला. अपूर्वचा येत्या दिवाळीत ठरलेला. दोघांसह आई-वडील व आदित्यच्या पत्नीला संसर्ग (Infection) झालेला. पाचही जण वेगवेगळ्या रुग्णालयांत (Hospital) दाखल. या महामारीतून सुखरुप बाहेर पडू, असा सर्वांना विश्र्वास. एकमेकांना धीर दिला. पण, शुक्रवारी दुपारी अपूर्वने आणि शनिवारी पहाटे आदित्यने निरोप घेतला. वडिलांवर वायसीएम रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. कोरोनातून (Corona) बऱ्या होऊन घरी आलेल्या सासू-सुनांच्या अश्रुंचा बांध मात्र फुटला आहे. आकुर्डी येथील जाधव कुटुंबीयांची ही शोकांतिका. (Two Brothers Fight against Corona Fails)

दत्तवाडी आकुर्डी येथील विजय जाधव (मूळगाव कढोली, जि. सातारा) यांचे मध्यमवर्गीय सुखी कुटुंब. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी संसाराचा गाडा हाकलला. कालांतराने दोन्ही मुले बरोबरीचे झालेत. आदित्य (वय २७) नमो बिल्डर्स यांच्याकडे नोकरीस होता. तर, अपूर्व (वय 25) यांचे पुणे महापालिका सेवेत कंत्राटी कामगार होता. भवानी पेठेतील सोनवणे रुग्णालयात तो कार्यरत होता. कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने तपासणी केली. संसर्ग झाला होता. त्यामुळे घरातील सर्वांचीच तपासणी केली. आई-वडील, भाऊ, वहिनी सर्वांनाच संसर्ग झालेला. सर्व जण वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल झाले. एकमेकांशी फक्त फोनवर बोलणे. आठ दिवसांच्या उपचारानंतर आई व वहिनीला डिस्चार्ज मिळाला. आता दोन्ही मुले व पतीही बरे होऊन घरी येतील. या आशेवर आई होती.

गुरुवारी अपूर्वची आॅक्सिजन पातळी पंच्यान्नवपेक्षा अधिक होती. पण, शुक्रवारी दुपारी त्याची प्रकृती खालावल्याचा निरोप आला आणि त्याची मित्रमंडळी रुग्णालयात पोचत नाही तोच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सर्वांनाच धक्का बसला. त्याच्यावर अंत्यसंस्कार करून काही तास उलटत नाही, तोच शनिवारी पहाटे आदित्यने जगाचा निरोप घेतला. दोन्ही भावांचे अकाली जाणे सर्वांसाठीच धक्कादायक ठरले. त्यांच्या पश्चात आई, वडील, वहिनी व बहिण असा परिवार आहे. सकाळचे कर्मचारी हेमंत कोंडे त्यांचे मामा होत. दोन्ही मुलांचे निधन झाले, हे अद्याप वडिलांना माहिती नाही.

मित्रांच्या प्रयत्नांना अपयश

नमो बिल्डरचे संचालक योगेश जैन व देवेश जैन यांनी आदित्यच्या उपचारासाठी खूप प्रयत्न केले. त्यांचे सहकारी अमर दुर्गावले व अरविंद वाघ हे दररोज पीपीई कीट घालून रुग्णालयात जायचे. आदित्यचे मनोधैर्य उंचवायचे. समुपदेशन करायचे. योगेश जैन यांनी उपचारासाठी सुमारे तीन लाख रुपये खर्च केले. त्याच्या कुटुंबीयांना वेळोवेळी धीर दिला. पण, आदित्य आम्हाला सोडून गेला, अशी भावना त्याच्या मित्रांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abrar Ahmed Video : भारताच्या 'गब्बर' ला बुक्क्याने मारायची इच्छा! मुंडी हलवणाऱ्या पाकिस्तानानी खेळाडूचं धाडस ऐका...

Education News : शिक्षणाधिकारीच अडकले! विस्तार अधिकाऱ्यांच्या पत्नीकडून बदलीसाठी 'अवघड क्षेत्रा'ची खोटी माहिती; दिंडोरीत खळबळ

Tata Trusts: टाटा ग्रुपमध्ये वाद! 157 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ट्रस्टमध्ये दोन गट, काय आहे प्रकरण?

Nobel Prize 2025 : क्वांटम संशोधनाला सलाम! जगाला आश्चर्यकारक फायदा; तीन शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर

Gold Crash: सोन्याचा फुगा लवकरच फुटणार; भाव 77,700 रुपयांवर येणार, तज्ञांचा धक्कादायक इशारा

SCROLL FOR NEXT