पिंपरी-चिंचवड

मावळ : बेडसे लेणीजवळ आढळल्या दोन गुहा

दक्ष काटकर

टाकवे बुद्रूक (ता. मावळ) : बेडसे येथील प्राचीन बौद्ध लेणीपासून काही अंतरावर दोन गुहा आढळून आल्या असून, त्यातील एका गुहेत शिवलिंग आढळले आहे. या गुहा व शिवलिंग पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करीत आहेत. 

मावळ तालुक्‍याला गडकिल्ल्यांचे वैभव लाभले आहे. गडकिल्यांबरोबर येथे कार्ला, बेडसे, भाजे, कोंढाणे यासारख्या प्राचीन लेण्या आहेत. मावळात अनेक अर्धवट स्वरूपात कोरलेल्या लेण्या आढळतात. बेडसेतील राम ज्ञानू दहिभाते, राम हनुमंत दहिभाते, मयूर दहिभाते व सुरेश तोडकर हे रानभाज्या आणण्यासाठी डोंगरात गेले असताना त्यांना या दोन गुहा आढळून आल्या. एक लहान गुहा दगडावर दगड रचून बंद केलेल्या स्वरूपात आढळून आली तर दुसरी गुहा वाढलेल्या झाडांमुळे दिसत नव्हती. स्थानिक नागरिकांनी रचलेले दगड काढून लहान गुहेत धाडस करून आतमध्ये गेले असता त्यांना दीड फूट खोल पाण्याच्या कुंडात छोटे काळ्या पाषाणातील शिवलिंग दिसले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पहिली गुहा 
- गुहेचे तोंड खूप लहान असल्याने फरफटत जावे लागते 
- वीस फूट लांब आहे 
- दीड फूट खोल पाण्याच्या कुंडात काळ्या पाषाणातील शिवलिंग 

 
दुसरी गुहा 
- दुसऱ्या गुहेचे तोंड मोठे असून 30 फूट लांब 
- आत गेल्यावर गुहा निमुळत्या स्वरूपाची आहे 
- गुहेत एक माणूस झोपू शकेल अशी जागा 

 
पूर्वी बेडसे लेणी कोरण्याचे कामे चालू असताना तात्पुरत्या स्वरूपात राहण्यासाठी किंवा त्याअगोदर ध्यानधारणा करण्यासाठी या नैसर्गिक गुहांचा वापर केला असावा. लहान गुहेत पाण्याचे कुंड आहे आणि त्या कुंडात बारा महिने पाणी राहत असावे म्हणून इथे राहण्यासाठी वापर केलेल्या व्यक्तीने किंवा ध्यानधारणा केलेल्या व्यक्तीने कुंडात पिंड ठेवली असावी, असा अंदाज आहे. 
- राज बलशेटवार, इतिहास अभ्यासक 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinayak Raut : उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय राऊतांकडून सुनेचा छळ?, ठाण्यात गुन्हा दाखल; नगरसेवक पतीवर गंभीर आरोप

Shalarth ID Scam : शिक्षकांची फसवणूक करणारा रिपाइं शिक्षक आघाडीचा जिल्हाध्यक्ष गजाआड; 'शालार्थ' घोटाळ्यात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई, न्यायालयात 11 हजार पानांचं दोषारोपपत्र सादर

Devendra Fadnavis: इतिहासातील सर्वांत मोठी कर्जमाफी; मुख्यमंत्र्यांचा विश्‍वास; बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई

BSNL Satellite Phone झाला लाँच! डोंगर, समुद्र, जंगलातही फुल्ल नेटवर्क; पूर, भूकंप, आपत्तीमध्येही संपर्क तुटणार नाही, किंमत फक्त...

Beed: घाटनांदूरमध्ये भररस्त्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून तरुणाला संपवले

SCROLL FOR NEXT