Crime
Crime 
पिंपरी-चिंचवड

बनावट एफडीआर प्रकरणी पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी दोन जणांवर गुन्हे

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - महापालिकेच्या निविदांसाठी बॅंक गॅरंटीपोटी बनावट एफडीआर सादर करणाऱ्या आणखी दोन ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी एका ठेकेदाराला पोलिसांनी अटक केली आहे.

बी. के. कन्स्ट्रक्‍शन ॲण्ड इंजिअरिंग कंपनीचे मालक परमेश्वर हनुमंत क्‍यातनकेरी (वय ५०, रा. पार्श्वनाथ सोसायटी रोड, पुणे) असे अटक केलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. तर, राधिका कन्स्ट्रक्‍शनचे मालक अटल प्रितमदास बुधवानी (वय ६१, रा. संचेती स्कुलजवळ, थेरगाव) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी महापालिका स्थापत्य विभागाचे लेखा अधिकारी रमेशकुमार विठ्ठलराव जोशी यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

क्‍यातनकेरी यांनी २६ जून २०१९ ते १० जुलै २०२० या कालावधीत महापालिकेची १७ लाख ५६ हजार रुपये किमतीची स्थापत्य विषयक दोन कामे घेतली होती. त्यांनी टीजेएसबी बॅंकेची ३६ हजार रुपये बॅंक गॅरंटी महापालिकेला सादर केली होती. ही बनावट एफडीआर असल्याचे समोर आले आहे. तसेच, बुधवानी यांनी २० डिसेंबर २०१९ ते १३ फेब्रुवारी २०२० या कालावधीत पालिकेची ११ कोटी  ४० लाख ४१ हजार ३११ रुपयांची स्थापत्य विषयक तीन कामे घेतली होती. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र बॅंकेची दोन कोटी ९८ लाख ५० हजार रुपये बॅंक गॅरंटी सादर केली होती. ही बॅंक गॅरंटी बनावट असल्याचे समोर आले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईचीही सुरावात खराब; चार फलंदाज तंबूत

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT