पिंपरी-चिंचवड

...अन् 'त्या' दोघांनीही आपले जीवन संपविले; पिंपरी-चिंचवडमधील घटना 

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गुरुवारी (ता. 19) घडलेल्या चार आत्महत्येच्या घटना ताज्या असतानाच आणखी दोघांनी आत्महत्या करून जीवन संपविल्याचे समोर आले आहे. सलग दोन दिवसांत सहा आत्महत्येच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. 

चिंचवडमधील दळवीनगर येथे प्रतीक मनोहर कडव (वय 30) यांनी शुक्रवारी (ता 19 ) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.  त्यांचे दोन महिन्यापूर्वीच लग्न झाले आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. 
तर दुसरी घटना शुक्रवारी दुपारी पिंपळे गुरव येथे उघडकीस आली. प्रतीक कचरू कोकणे (वय 30, गंगोत्रीनगर, पिंपळे गुरव) यांनी आत्महत्या केली. आईसह राहत असलेल्या प्रतिकने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. 

दरम्यान, गुरुवारीही (ता. 18) चार आत्महत्येच्या घटना उघडकीस आल्या. सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या प्रशांत नरेंद्र सेठ (वय 32, रा. क्रॅप्सेसिया सोसायटी, वाकड) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी दुपारी उघडकीस आली. पत्नी व मुले घरात असतानाच ही घटना घडली. दरम्यान, त्यांच्याजवळ एक चिठ्ठी सापडली असून "माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये' असे त्यामध्ये नमूद आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तर वाकडमधील शिवराजनगर येथे इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून कनिका नरेंद्रकुमार शर्मा (वय 33, रा. फ्लॅट क्रमांक 802, डी विंग, डेलवेरा सोसायटी, शिवराजनगर, वाकड) या महिलेने आत्महत्या केली. शर्मा यांना अडीच वर्षांचा मुलगा असून त्या अनेक दिवसांपासून पतीपासून विभक्त राहतात. गुरूवारी दुपारी त्या मुलासोबत घरीच होत्या. 

तसेच रहाटणी येथे गेणदेव बाबुराव काशिद (वय 40, रा. निसर्ग कॉलनी, रहाटणी) हे गुरूवारी दुपारी घरी एकटे असताना गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी माहेरी निघून गेल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. ते केबल ऑपरटरचे काम करायचे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

तर चौथी घटना देहूगाव येथे घडली. आकाश गायकवाड (वय 24 ) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 
आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. तर पोलिसांच्या तात्परतेमुळे राहातणी येथील एकाला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB चा फलंदाज Unstoppable ! १४ चेंडूंत ६४ धावा कुटून संघाला मिळवून दिला दणदणीत विजय; KKR ला होतोय पश्चाताप

Latest Maharashtra News Updates : बदलापुरात गावगुंडांकडून पोळी भाजी केंद्राची तोडफोड

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर डबल बेड मॅट्रेस अन् सोफ्यासह दुरुस्तीचा खर्च तब्बल ४० लाख; इतकी उधळपट्टी कशाला? विरोधकांचा सवाल

Gemini Photo Trend : गुगल जेमिनीवर तुम्ही फोटो बनवताय, पण त्या फोटोचे पुढे काय होते? खरंच यामुळे डेटा लिक होतो का..जाणून घ्या सत्य

Maruti car price cut : दसरा, दिवाळीच्या आधी ‘मारूती’चा बडा धमका! कारच्या किंमतींमध्ये मोठी कपात जाहीर

SCROLL FOR NEXT