Two thieves stealing mobiles and laptops from Pimpri have been nabbed by Crime Branch Unit two 
पिंपरी-चिंचवड

मोबाईल चोरणारे दोन सराईत चोरटे गजाआड; बारा मोबाईल जप्त

मंगेश पांडे

पिंपरी : मोबाईल, लॅपटॉप चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना गुन्हे शाखा युनीट दोनच्या पथकाने जेरबंद केले. या कारवाईत चोरीचे बारा मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. 

आयुब चमन खान (वय 22), इमतेज मुस्ताक शेख (वय 24, दोघेही रा. ओटास्कीम, निगडी) अशी आरोपींची नावे आहेत. तीन ऑक्‍टोबरला सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास प्रदीपकुमार श्रीरतनलाल गोयल हे निगडीतील ट्रान्सपोर्टनगर येथील पीएमपीएमएल आगारासमोरून लॅपटॉपच्या बॅगेसह पायी जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेले दोघेजण त्यांच्याकडील लॅपटॉपसह मोबाईल हिसकावून पसार झाले. याबाबत निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. 

दरम्यान, गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार पथकाने ओटास्कीम येथे सापळा रचून खान व शेख यांना ताब्यात घेतले. त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीची तपासणी केली असता, त्यामध्ये बारा महागडे मोबाईल व लॅपटॉपचे तुकडे सापडले. अधिक चौकशी केली असता त्यांचा साथीदार मनोज जाधव याच्यासह शहरात जबरी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली त्यांनी दिली. 
 
कारागृहातून सुटला होता पॅरोलवर 

इमतेज शेख याच्यावर खुनाचे दोन गुन्हे दाखल असून सध्या तो कारागृहातून पॅरोलवर सुटला आहे. आयुब खान हा हिंजवडी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात फरारी होता. या आरोपींकडून एक लाख 38 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ट्रान्सपोर्टनगर येथे घडलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: शत्रूपक्षातील सौहार्द! संजय राऊतांची प्रकृती बिघडली; नरेंद्र मोदींचा ‘गेट वेल सून’ संदेश, खासदारांनी दिलं भावनिक उत्तर

चुकीचे काम करावे, नोकरी सोडावी म्हणून ‘फायनान्स’मधील तरुणीचा विनयभंग, छळ! ब्रॅंच मॅनेजर, सेल्स मॅनेजर, एरिया क्रेडिट मॅनेजर, लिगल हेडसह १० जणांवर गुन्हा

Kannad News : कन्नड नगरपरिषदेच्या विकासकामांसाठी ९ कोटी २६ लाखांचा निधी मंजूर

Boisar Fire : बोईसरमधील कार्पेट कारखान्याला आग; चार कामगार गंभीर जखमी

Women’s World Cup 2025 Prize Money : वर्ल्ड कप जिंकल्यावर टीम इंडियाला किती कोटींचं बक्षीस मिळणार? ICC ने केलीय मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT