Supreme Court  esakal
पिंपरी-चिंचवड

Unauthorized Construction: लाखो-करोडोंचा चुराडा! पिंपरी-चिंचवडमधील 29 बंगले पाडण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

PCMC: पिंपरी-चिंचवड शहराच्या उत्तरेकडून इंद्रायणी नदी वाहते. तिच्या पूररेषेत प्लॉटिंग करून जागेची विक्री केली आहे. त्यावर लाखो रुपये खर्चून नागरिकांनी बंगले बांधले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Supreme Court Orders Demolition of 29 Bungalows: इंद्रायणी नदी पात्रालगतची जाधववाडी चिखली येथील अनधिकृत‌ २९ बंगले कायमचे जमीन दोस्त करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला आहे. त्यामुळे महापालिकेकडून कारवाई केव्हा होणार? याची प्रतीक्षा आहे. दरम्यान, या बंगल्यांसह परिसरातही बांधकामे आणि काही बंगल्यामध्ये अंतर्गत कामे सुरू असल्याचे बुधवारी आढळले.

पिंपरी-चिंचवड शहराच्या उत्तरेकडून इंद्रायणी नदी वाहते. तिच्या पूररेषेत प्लॉटिंग करून जागेची विक्री केली आहे. त्यावर लाखो रुपये खर्चून नागरिकांनी बंगले बांधले आहेत. तीन-चार मजली घरे सुद्धा आहेत. याबाबत पर्यावरण प्रेमी वकील तानाजी गंभीरे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागितली होती. लवादाने सर्व बंगले पाडण्याचा आदेश दिला होता. या निर्णयाच्या विरोधात संबंधितांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने हरित लवादाचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे महापालिका काय भूमिका घेते, याकडे लक्ष आहे.

वास्तव

- प्रतिप्लॉट १८ ते २० लाख रुपये गुंठा, याप्रमाणे खरेदी-विक्री झालीय
- बंगले असल्याने किमान ७० लाखांपेक्षा अधिक बांधकाम खर्च केलाय
- ड्रेनेज लाइन व नळजोड महापालिकेने, तर महावितरणने वीजजोड दिलेत
- निबंधकांकडील नोंदीचे सातबारा उतारे नागरिकांकडे आहेत
- वर्षाला सुमारे २८ हजार रुपये मिळकतकर भरल्याचे रहिवाशांनी सांगितले
- महापालिकेने दोन महिन्यांपूर्वी प्रत्येक बंगल्याला गृहक्रमांक दिले आहेत

आढळलेली स्थिती

- बंगल्यासंदर्भात उघडपणे बोलायला कोणीही तयार नाही
- नाव न छापण्याच्या अटीवर, आमची फसवणूक झाल्याचे दोघांनी सांगितले
- प्लॉट खरेदी-विक्री किंवा घराची नोंदणी करताना संबंधित अधिकाऱ्यांनी सांगायला हवे होते, असेही ते म्हणाले
- नदीच्या बाजूला पत्रा लावून कुंपन केलंय
- नदी किनारी चिखली, मोशी, चऱ्होलीतही बांधकामे सुरू
- इंद्रायणीप्रमाणे मुळा व पवना नदीच्या काठांवरही बांधकामे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT