sonalee kulkarni  
पिंपरी-चिंचवड

अभिनेत्री सोनालीच्या वडिलांवर चाकूहल्ला करणारा तिचा 'फॅन'?

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी राहत असलेल्या निगडी येथील इमारतीत शिरलेल्या तरुणाने सोनालीच्या वडिलांवर चाकू हल्ला केला. दरम्यान, आरोपी सोनालीचा 'फॅन' असून सोनालीने दुबईत विवाह केल्याचे समजल्यापासून तो बेचैन होता. तिला भेटण्यासाठी घरी आल्यानंतर झालेल्या झटापटीत हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. मात्र, या आरोपीकडे नकली बंदूक, घरगुती चाकू, स्प्रे, दोरी सापडली असून तो चोरीच्या उद्देशाने आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून त्याच्यावर तसा गुन्हाही दाखल केला आहे.

अजय विष्णू शेक्टे (वय २४, रा. पाचरगी, ता. पाटोदा, जि. बीड) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी अभिनेत्री सोनाली यांचे वडील मनोहर गणपतराव कुलकर्णी (वय ६३, रा. वरलक्ष्मी अपार्टमेंट, सेक्टर क्रमांक २५, प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोनाली यांचे कुटुंबीय प्राधिकरणात वरलक्ष्मी अपार्टमेंट या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर राहतात. मंगळवारी सकाळी सोनालीचे आई - वडील घरात असताना आरोपी अजय सकाळी सातच्या सुमारास या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर आला. येथे त्याची एका रहिवाशासोबत झटापटी झाली. त्याने आरडाओरडा केल्याने सोनाली यांचे वडील खाली धावत आले. यावेळी अजयने मनोहर यांच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. तरीही मनोहर यांनी अजयला अटकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजयने त्यांच्यावर चाकूने वार केला. यामध्ये ते किरकोळ जखमी झाले. त्यानंतर अजय तिसऱ्या मजल्यावर आला. मनोहर यांच्या पत्नीला गळ्यातील सोन्याचे दागिने काढून द्या, अन्यथा तुम्हाला जीवे मारेल, अशी धमकी दिली. आरडाओरडा झाल्याने परिसरातील नागरिकांनी कुलकर्णी यांच्या घराकडे धाव घेतली.

यावेळी अजयने पळून जाण्याच्या प्रयत्नात दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. मात्र, तो हॉटेलच्या पत्र्यावर पडल्याने त्याच्या पायाला जखम झाली. अजयला पकडून नागरिकांनी त्याला चोप दिला. याबाबत पोलिसांना कळविल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी अजयला ताब्यात घेतले. त्याच्याकडून नायलॉन दोरी, चाकू, स्प्रे जप्त केले. दरम्यान, नागरिकांनी केलेल्या मारहाणीत अजय जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले.

दरम्यान, आरोपी अजय हा सोनाली यांचा चाहता असून सोनालीला भेटायला जायचं असं त्याने ठरवलं होतं. अशात नुकतंच सोनालीने दुबईत विवाह केल्याचं सोशल मीडियावर जाहीर केल्यानंतर तो बेचैन होता. एकदा बोलावं तरी, भेटावं तरी असं वाटायचं. 'दरम्यान, अजय मंगळवारी त्यांच्या घरापर्यंत पोहचला. त्यातूनच त्याने हा प्रकार केल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT