पिंपरी-चिंचवड

कोरोनाची भीती मेलीय, पोटासाठी हाताला काम हवं; पिंपरीतील झोपडपट्ट्यांमधील अस्वस्थ करणारं वास्तव

अविनाश म्हाकवेकर

पिंपरी : कोरोनामुळं लोक घराघरात सुरक्षित वातावरणात बसून आहेत. नोकऱ्या, उद्योगधंदे काहीअंशी का होईना सुरू आहेत. घर चालेल असं उत्पन्न मिळत आहे. मात्र, झोपडपट्ट्या अस्वस्थ आहेत. काही ठिकाणी कोरोना शिरलायं. मात्र, त्याच्या भीतीपेक्षा दररोजच्या जगण्याची लढाई त्यांना मोठी वाटतेय. शहर बऱ्याचअंशी सुरू झालं असलं, तरी झोपडपट्ट्यांच्या परिसरात सगळं काही बंद आहे. नेमकी काय आहे परिस्थिती हे जाणून घेण्यासाठी 'सकाळ'च्या प्रतिनिधीने झोपडपट्ट्या परिसरात फेरफटका मारला. याविषयी अनेकांशी बोलणं झालं. सगळ्यांशी बोलताना जाणवत होती अस्वस्थता. काम गेलं आहे यापेक्षा ते आता मिळणारच नाही, अशा निराशेने त्यांच्यात उद्विग्नता आली असल्याचे दिसते.

सहा घरात धुण्या भांड्याची कामे करायची. नवऱ्याची अंडा-भुर्जीची गाडी होती. कोरोना आला आणि सगळं बंदच पडलं. आमचं हातावरचं पोट. दोन तरुण मुलं आहेत; त्यांनाही काम नाही. तीन महिने झाले या गोष्टीला. आता लॉकडाउन संपेल असं वाटलं होतं; पण पुन्हा वाढला. घरात सगळा खडखडात आहे. वय झालंय. सगळेजण भणाणून गेलो आहोत.

- नंदा रामदास उदमाले, दापोडी

लहानपणी चुकीच्या संगतीमुळे चोऱ्या करायला लागलो. लोकांनी दूर केलं. मी आणखी बिघडलो. मारामाऱ्या, घरफोड्या असे दहा गुन्हे केले. पोलिसांनी 26 गुन्हे लावले. आता सराईत अशी ओळख झालीय. जामीनावर बाहेर आहे. तुरूंगात दोन वेळच्या जेवणाची तरी व्यवस्था झाली असती. आता मी काय करू? डोकं भणाणून गेलय.

- सनीकुमार, निगडी ओटास्कीम

या दोन प्रतिक्रिया म्हणजे झोपडपट्टीतील वास्तव चित्र आहे. प्रत्येक झोपडील लहान मुले आणि वयस्कर लोक वगळता सर्वजण रोजगाराला जातात. बहुतांश महिला मोलकरणी, तरुण मुले-मुली दुकानांमध्ये सेल्समन, थोडे प्रौढ रिक्षा-टेम्पो ड्रायव्हर, धडधाकट हमाली... याशिवाय अवैध धंद्यात असलेलाही मोठा वर्ग आहे. येथे दररोज रात्री भांडणतंटा आणि पोलिसांकडून धरपकड नेहमीचीच असते. निवडणूकीत विजयी होण्यासाठी हक्काचा मतदार म्हणून राजकीय पाठबळ. यातून पुन्हा गट-तट निर्माण झालेले. शिक्षणापासून सामाजिक स्तरापर्यंत झोपडपट्ट्यांचे मागासलेपण आणि मुलभूत सुविधांपासून वंचित हे ठळक वैशिष्ट्य आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या पार्श्‍वभूमीवर कोरोनामुुळे सद्य:स्थितीविषयी भाटनगर येथील सामाजिक सुधारणा चळवळीतील कार्यकर्ता विकी तामचिकर म्हणतो, आता झोपडपट्ट्यांमध्ये सर्वात मोठा प्रश्‍न दररोजच्या जेवणाचा आहे. सुरूवातीचे आठ-पंधरा दिवस काहींकडून अन्नधान्याचे कीट दिले गेले. रेशनचे धान्य मिळाले. मात्र, आता दररोज तरी कोण देणार जेवण. मुळ कामावरही लोक घेत नाहीत. जगणे मुश्‍किल झाले आहे. त्यामुळे सगळेजण हादरले आहेत. मुळात अशिक्षित, अल्पशिक्षित असलेल्या वर्गाला घराबाहेर पडता येत नाही, हेच मोठे संकट वाटू लागले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

घराघरात भांडणाचे प्रमाण वाढले आहे. नशेचा शाप त्यांना अधिक बैचेन करत आहे. गेल्या आठ-दिवसांत घडलेल्या मारामाऱ्या, चोऱ्या हे याचेच कारण आहे. आम्ही चांगल्या सुधारणा घडविण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांनाही खिळ बसली आहे. कारण भरल्या पोटी ते थोडं का होईना ऐकत तरी होतं. आता कोण ऐकणार?

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फेरफटक्‍यात असंही जाणवलं की, एरव्ही सकाळी लवकर उठून आपापल्या कामावर जाणारे लोक आपापल्या घरासमोर बसून असतात. कारण दुकानदारांना आता झोपडपट्टीतील कामगारवर्ग नको आहे. काही तरुणांनी आता भाजी विक्रीच्या व्यवसाय सुरू केला आहे. घाऊक व्यापाऱ्याकडून आणलेली भाजी फुटपाथवर घेऊन ते बसतात. सुटलेले काम पुन्हा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आता झोपडपट्ट्यांमधील कोरोना भीती मेलीय. पोटाला अन्न आणि हाताला काम हवे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT