The vegetable market had been closed for the last 15 years was about to reopen 
पिंपरी-चिंचवड

गेल्या 15 वर्षापासून बंद भाजी मार्केट पून्हा सुरू होणार होते..

रमेश मोरे

जुनी सांगवी : जुनी सांगवी येथील मध्यवर्ती भागात एकूण ७६ गाळे असलेले राजीव गांधी भाजी मार्केट गेली 15 वर्षांपासून बंद आहे. लॉकडाऊनच्या आधी पुन्हा हे भाजी मार्केट सुरू करण्यासाठी पालिका स्थापत्य विभागाकडून यास सज्ज करण्यात आले. मात्र, सोशल डिस्टेन्सिगंचा नियम पाळला जाणार नसल्याच्या कारणाने ते पुन्हा गेली तीन महिन्यांपासून रंगरंगोटी होवूनही धूळखात पडून सुरू होण्याची प्रतिक्षा करत आहे.

घरात बसले आणि पाण्यात खेळले पिंपरी-चिंचवडकर

गेली दहा ते बारा वर्षांपासून हे भाजी मार्केट बंद राहिलेले आहे. यात फेरीवाल्यांकडून रस्त्यावर गल्ल्लीबोळांमधून होणारी भाजी विक्री, पालिकेचे न परवडणारे भाडे, भाजी मार्केटकडे ग्राहक नागरीकांनी फिरवलेली पाठ यामुळे धंदाच होत नसल्या कारणाने भाजीविक्रेत्यांनीही गेली एक तपापासून या भाजीमार्केटकडे दुर्लक्ष केले. याचा परिणाम मुख्यरस्त्यावर झाला. कारण दरम्यानच्या काळात शितोळेनगर ते एकता चौक या प्रमुख बाजारपेठ असलेल्या रहदारीच्या रस्त्यावरील पदपथांना भाजी मार्केटचे स्वरूप आले.यामुळे वाहातूक कोंडी, किरकोळ अपघातांच्या समस्यांमुळे सुज्ञ नागरीकांमधून या रस्त्यावरील भाजीविक्रीला विरोध होवून तक्रारी येवू लागल्याने गेली दोन वर्षापासून मुख्य रस्त्यावरील होणारी भाजी विक्री कमी रहदारी असलेल्या गल्लीवजा रस्त्यावर स्थलांतरीत करण्यात आलीक होती.

मास्कचा वापर करत नाही? तर...

मुख्य रस्त्ता मोकळा झाल्याने या रस्त्यावरील वाहातूकीची समस्या सुटण्यास मदत झाली.मात्र स्थलांतरीत केलेल्या रस्त्यालगत सोसायटी रहिवाशी नागरीकांच्या तक्रारी येवू लागल्या. भाजी खरेदी विक्रीचा गजबजाटामुळे होणारा गलका आरडाओरड्यामुळे पून्हा धूळखात पडून असलेले ७६ गाळ्यांचे बंद पडलेले भाजी मार्केट पुन्हा सुरू करून भाजी विक्रेत्यांची तेथेच सोय करावी अशी नागरीकांमधून मागणी होवू लागल्याने फेब्रुवारी महिन्यात येथील भाजी मार्केटची डागडूजी व रंगरंगोटीचे काम पुर्ण करण्यात आले होते. मात्र, कोरोनामुळे पुन्हा गेली तीन महिन्यांपासून हे भाजी मार्केट पुन्हा सुरू होण्यासाठी प्रतिक्षा करत आहे.

मास्कचा वापर करत नाही? तर...

लॉकडाऊन काळात गर्दी रोखण्यासाठी व संसर्ग रोखण्यासाठीची उपाय योजना म्हणून पालिका प्रशासनाकडून येथील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर भाजी खरेदी विक्रीसाठी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, मार्च एप्रिलमधील कडक ऊन अपुरी व्यवस्था यामुळे या तुटपुंज्या व्यवस्थेकडेही विक्रेते व नागरीकांनी पाठ फिरवली होती तर, सध्या मुख्य रस्त्याचे पून्हा भाजी मार्केट झाले आहे. वारंवार पालिकेकडून नागरीकांची गर्दी रोखण्यासाठी व सोशल डिस्टेन्सिंगच्या नावाखाली या भाजीविक्रेत्यांविरूद्ध कारवाई करून उभ्या राहणाऱ्या हातगाड्या जप्त केल्या आहेत. अशात भाजीविक्रेत्यांनी पदपथावरच जमिनीवर भाजी विक्री सुरू केली आहे तर, नागरीक म्हणताहेत रस्त्यावर आजही अशी गर्दी होतेच आहे. यापेक्षा सर्व सुविधा उपाययोजना करून पालिकेने बंद असलेले भाजी मार्केट सुरू करावे. अशी नागरीकांमधून मागणी होत आहे. भाजी मंडई सुरू करण्याबाबत येथील माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांनीही पालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात आढळलेले रुग्ण 'या' भागांमधील

 ''याबाबत पालिका प्रशासनच सोशल डिस्टेंन्सिंग सुविधाबाबत योग्य ती कार्यवाही करून निर्णय घेईल.''
- संतोष कांबळे सदस्य स्थायी समिती

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT