पिंपरी-चिंचवड

भाज्यांच्या भाववाढीनं नागरिकांना झटका; विक्रेत्यांकडून 'अव्वाच्या सव्वा' भावाने विक्री

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : लॉकडाउन घोषित होताच किरकोळ विक्रेत्यांनी भाजीपाल्याची आवक मर्यादित असल्याचे सांगत 'अव्वाच्या सव्वा' भाव आकारण्यास सुरुवात केली. परिणामी आठवड्यापूर्वी 30 रुपये किलो भाव असलेल्या टोमॅटोची 80 रुपये किलोने विक्री सुरू आहे. त्यामुळे टोमॅटो खरेदी करताना प्रति किलोला 50 रुपये गृहिणींना मोजावे लागत आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू होणाऱ्या लॉकडाउनमुळे नागरिकांनी विविध खरेदीसाठी शनिवारी बाहेर पडण्यास सुरुवात केली. लॉकडाउनच्या धास्तीने नागरिकांनी भाजी खरेदीसाठी गर्दी केली आहे. भाजीपाला बाजारात टोमॅटोची आवक असतानाही, अचानक एका दिवसांत प्रतिकिलोचे भाव गगनाला भिडले आहेत. प्रति किलो 30 रुपये असलेला टोमॅटोचे भाव आता 80 रुपयांच्या घरात पोचले आहेत. 20 रुपये प्रतिकिलो बटाटा प्रतीभाव 50 रुपये किलोवर विकला जात आहे. त्यामुळे टोमॅटो खरेदी करताना प्रती किलोमागे 50 रुपये जादा भाव गृहिणींना मोजावे लागत आहे. इतर भाजीपालाही किमान 60 रुपये किलोच्या घरात आहे. नागरिकांची होणारी गर्दी पाहता किरकोळ भाजी विक्रेत्यांनी भाजीपाल्यांचे भाव वाढविले आहे. रस्त्यावर अनेक भाजी विक्रेत्यांनी दुकाने मांडली आहेत. आवक कमी झाल्यामुळे भावात वाढ झाल्याचे भाजी विक्रेत्या कांताबाई शिंदे यांनी सांगितले असून, टोमॅटोची भाववाढ आणखी काही दिवस राहण्याची शक्‍यता आहे. 

मेथी बाजारात दिसू लागली असून, भाव मात्र 30 रुपये जुडी इतका आहे. अपवाद वगळता अन्य पालेभाज्या बाजारात दिसत नाहीत. कोथिंबीर अद्याप महागच असून, मोठी जुडी 40 रुपयाला विकली जाते. अन्य भाज्यांमध्ये वांगी 60 रुपये, गवार 80 रुपये, भेंडी 40 रुपये, कारली 40 ते 60 रुपये, फ्लॉवर 60 रुपये, कोबी 40 रुपये, दोडकी 40 रुपये, शिमला मिरची 40 रुपये किलो याप्रमाणे दर आहेत. तर कांदा 40 रुपये किलो, बटाटा 50 रुपये, हिरवी मिरची 80 रुपये, आले 80 ते 90 रुपये, लसूण 100 रुपये किलो याप्रमाणे भाव आहे. परिणामी भाजीपाल्याचे भाव दुपटीने वाढले आहे. सर्वाधिक टोमॅटो आणि मिरचीची आवक अल्प असल्यामुळे प्रती किलोचे भाव 80 ते 100 रुपयापर्यंत पोचले आहेत. त्यामुळे भाजीपाला खरेदी करण्याअगोदर गृहिणींना अर्थकारणाचा विचार करावा लागत असल्याचे ग्राहक महेश गावडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT