Violation of rules of Social distancing in pimpri  
पिंपरी-चिंचवड

नागरिकांनो, एवढा निष्काळजीपणा बरा नव्हे ! कोरोनाचे संकट अजुनही...

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : लॉकडाउन शिथिल करत असताना प्रत्येकाला सुरक्षितता पाळायला लागणार, असा सल्ला सरकारकडून देण्यात येत असला तरी शहरातील नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचा विसर पडला आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्यास निमंत्रण मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. रविवारच्या सुटीच्या दिवशी शहरातील अनेक भागांमध्ये या नियमाचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 

शहराचा रेड झोनमधे असणारा समावेश काही दिवसांपूर्वी काढण्यात आला. त्यानंतर कन्टेन्मेंट भाग वगळता अन्यठिकाणचे व्यवहार हळूहळू पूर्ववत होऊ लागले असले तरी दुकाने, बॅंका, याठिकाणी येणाऱ्या नागरिकांनी रांगेमध्ये थांबताना किमान तीन फूटाचे अंतर ठेवण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. सुरुवातीच्या काळात या नियमांचे काटेकोरपणे पालन होताना दिसले. आता मात्र, अनेक भागामध्ये नागरिकांकडून हा नियम पाळला जात नसल्याचे पाहायला मिळाले.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

कोरोनाचे संकट अद्याप गेलेले नाही, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांनी पूर्णपणे खबरदारी घेणे आवश्‍यक असल्याचे वारंवार सांगण्यात येत असले तरी नागरिक मात्र, लॉकडाउन शिथिल होत असल्यामुळे आता कोरोना गेला असल्याचा भ्रम नागरिकांमध्ये झाला आहे, त्यामुळे की काय त्यांना सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे विसर पडला आहे. दुकानांमध्ये खरेदीसाठी जाणारे ग्राहक आणि विक्रेते यांच्यामध्ये देखील ठराविक अंतर राखणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे होताना दिसत नसल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. 

शासनाच्या आदेशाचा विद्यार्थ्यांना फटका; गरवारे महाविद्यालयाचे २०० विद्यार्थी अकरावीत नापास

खरेदीसाठी बाहेर येणाऱ्या नागरिकांकडून मास्कचा वापर होत नसल्याचेही काही ठिकाणी पाहायला मिळाले. नागरिकांच्या अशा बेजबाबदार वागण्यामुळे कोरोनाचे संकट वाढण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

पुण्यात हे काय चाललंय, रोज `एवढे` जण करताहेत आत्महत्या; ही आहेत कारणे...​​

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT