Education sakal
पिंपरी-चिंचवड

Education Hub : वाकड-ताथवडे, रावेत-किवळे ‘एज्युकेशन हब’ म्हणून येत आहे उदयास

पिंपरी शहराच्या पश्चिमेकडील भाग विशेषतः वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे, मामुर्डी परिसरात विविध शैक्षणिक संस्थांची संकुले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - शहराच्या पश्चिमेकडील भाग विशेषतः वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे, मामुर्डी परिसरात विविध शैक्षणिक संस्थांची संकुले आहेत. अगदी केजी (पूर्व प्राथमिक शाळा) ते पीजीपर्यंतच्या (पदव्युत्तर पदवी महाविद्यालय) शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. शहरातील मुलांना उच्च शिक्षणासाठीच्या विविध विषयातील डिग्री, डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गालगतचा वाकड ते किवळे-मामुर्डीपर्यंतचा परिसर शैक्षणिक हब म्हणून उदयास येत आहे.

शहरात पूर्वी मोजक्याच शाळा, महाविद्यालये होती. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना पुण्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये जावे लागत होते. मात्र, कालांतराने रोजगाराच्या संधी वाढल्या. नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या वाढली. शहरातील लोकसंख्या वाढली. शेती क्षेत्र कमी होऊन नागरी वस्ती वाढली. शाळा, महाविद्यालयांची गरज भासू लागली. पूर्वीच्या स्थानिक शैक्षणिक संस्थांनी वर्गखोल्या वाढवल्या.

शाळा, महाविद्यालयांची संख्या वाढवली. विद्यार्थी व पालकांची गरज ओळखून पुण्यातील शैक्षणिक संस्थांनी आपल्या शाखा शहरातील विविध भागात सुरू केल्या. ताथवडेतील इंदिरा कॉलेज, जेएसपीएम स्कूल, राजर्षी शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, साई सकल शिक्षक प्रसारक मंडळ, किवळे-मामुर्डीतील सिंबायोसिस विद्यापीठ, मारुंजी येथील आलार्ड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, साई बालाजी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, रावेत येथील एस. बी. पाटील कॉलेज, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट अशा शैक्षणिक संस्थांनी आपली संकुले शहराच्या पश्चिम पट्ट्यात सुरू केली. विद्यार्थ्यांसाठी ते सोयीचे ठरत आहेत.

केजी ते पीजी शिक्षण

‘केजी’ ते ‘पीजी’ शिक्षणाची सुविधा शैक्षणिक संस्थांमुळे विद्यार्थी व पालकांना उपलब्ध झाली आहे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक पर्यंतच्या शिक्षणासाठी एसएससी, सीबीएससी व आयसीएससी बोर्डाच्या शाळा आहेत. कला, वाणिज्य व विज्ञान या विद्याशाखासह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रम, पदवी, पदव्युत्तर पदवीपर्यंतचे अभ्यासक्रम महाविद्यालयांमध्ये शिकविले जात आहेत. अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधनिर्माण, पत्रकारिता, व्यवस्थापन, हॉटेल मॅनेजमेंट अशा अभ्यासक्रमांचाही यामध्ये समावेश आहे.

विद्यार्थ्यांच्या पसंतीची कारणे

  • उत्तम दर्जाचे शिक्षण, मोठे कॅम्पस, एकाच ठिकाणी अनेक अभ्यासक्रम, अभ्यासेतर उपक्रम

  • शहरासह लगतचा ग्रामीण भाग आणि राज्य व राज्याबाहेरील विद्यार्थ्यांचीही शिक्षणासाठी पसंती

  • शहरातील वाहतूक सुविधा व महामार्गांशी कनेक्टिव्हिटी

  • शैक्षणिक संस्थांसह खासगी वसतिगृहांची अर्थात निवास व भोजनाची व्यवस्था

  • शिक्षण घेत असतानाच रोजगाराची अर्थात विविध कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची संधी

पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थ्यांची सोय लक्षात घेऊन, २००२ मध्ये आम्ही महाविद्यालयाची स्थापना केली. सध्या कनिष्ठ महाविद्यालयांसोबतच पदव्युत्तर पदवीपर्यंतचे विविध अभ्यासक्रम शिकविले जातात. विशेषतः हिंजवडी, माण भागातील विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे.

- ज्ञानेश्‍वर दळवी, अध्यक्ष, साई सकल शिक्षण प्रसारक मंडळ, वाकड

रावेत-किवळे परिसराचा होणारा विकास पाहता, येथील विद्यार्थ्यांसाठी आम्ही २०१४ मध्ये कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना केली. आता प्राथमिकपासून ते अभियांत्रिकीपर्यंतच शिक्षण दिले जाते. सुरुवातीला पिंपरी-चिंचवड परिसरातीलच विद्यार्थी यायचे. आता मावळ, खेड, मुळशी तालुक्यातील विद्यार्थीही दाखल होत आहेत.

- संदीप पाटील, प्राचार्य, एस. बी. पाटील कनिष्ठ महाविद्यालय, रावेत

पिंपरी-चिंचवडच्या कोणत्याही भागातून काही मिनिटांतच कॉलेजला पोहोचू शकतो. कॉलेज महामार्गालगत असल्याने कनेक्टिव्हिटी चांगली आहे. त्यामुळे मुंबईच्याही अनेक कंपन्या प्लेसमेंट व इंटर्नशिपसाठी येत असतात. त्यामुळे शिकत असतानाच जॉबची खात्री मिळते.

- ध्रुव कथाले, विद्यार्थी, जेएसपीएम राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय, ताथवडे

माझा मुलगा जेएसपीएम महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षाला शिकत आहे. कॉलेज घरापासून जवळ असल्याने प्रवासाचा वेळ वाचतो. चांगल्या शिक्षणा देण्याबरोबरच शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी महाविद्यालयाने भरपूर सहकार्य केले.

- दशरथ ठाणांबीर, पालक, मोहननगर, चिंचवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT