Indrayani River Esakal
पिंपरी-चिंचवड

Water Pollution : इंद्रायणीच्या पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण शून्य; नदी प्रदूषित करणारे मोकाटच

तीर्थक्षेत्र देहू आणि आळंदी. साधारण १६ किलोमीटर अंतर. इंद्रायणी नदीच्या सानिध्यातील स्थाने.

पीतांबर लोहार

पिंपरी - तीर्थक्षेत्र देहू आणि आळंदी. साधारण १६ किलोमीटर अंतर. इंद्रायणी नदीच्या सानिध्यातील स्थाने. त्यादरम्यान नदीच्या दक्षिण तीरावर उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड आणि उत्तर तीरावर अनेक गावे, खेडी आहेत. दोन्ही परिसरात सुमारे दहा हजारांवर छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत. त्यातील रसायनयुक्त सांडपाण्यावर सध्या कोणतीही प्रक्रिया केली जात नाही.

घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करत असल्याचा महापालिकेचा दावा आहे. पण मोठ्या प्रमाणात सांडपाणी मिसळत असल्याने नदीतील प्राणवायूच नष्ट झाला आहे. मृतावस्थेत ती वाहत असून, एकप्रकारे तिचा खूनच केला आहे.

कारण, इंद्रायणीच्या पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण शून्य असून, रासायनिक व जैवरासायनिक घटकांचे प्रमाण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानांकापेक्षा अनुक्रमे १४ आणि सहा पट अधिक आहे. असे असतानाही नदीचे मारेकरी उघड माथ्याने फिरत असून, प्रशासनाकडून कठोर कारवाईऐवजी केवळ कागदी घोडे नाचविले जात आहेत.

इंद्रायणी नदीमुळे शहराची उत्तरसीमा निश्चित झाली आहे. तळवडेपासून आळंदीतील सिद्धबेटाजवळील बांधापर्यंत आणि चोविसावाडीतील श्यामा इस्टेट सोसायटीच्या मागील बाजूपासून चऱ्होलीतील हिरामाता मंदिराजवळील निरगुडीच्या हद्दीपर्यंत नदीचा समावेश महापालिकेत होता. उत्तर बाजूकडे निघोजे, म्हाळुंगे, मोई, चिंबळी, कुरुळी, केडगाव, आळंदी, चऱ्होली खुर्द, धोनारे आदी गावे आहेत.

आळंदी नगरपरिषद असून, सर्व ग्रामपंचायती आहेत. त्या भागांसह शहरातील भोसरी, पिंपरी, चिंचवड एमआयडीसी, तळवडे, चिखली, कृष्णानगर, संभाजीनगर, मोशी, डुडुळगाव, भोसरी प्राधिकरण, इंद्रायणीनगर, दिघी, डुडुळगाव, चऱ्होली भागातील पाणी इंद्रायणी नदीला मिळते. त्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागातर्फे विविध ठिकाणचे नमुने घेतले जातात.

त्यानुसार पाण्यातील बीओडी अर्थात बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड (जैवरासायनिक ऑक्सिजन मागणी), सीओडी अर्थात केमिकल ऑक्सिजन डिमांड (रासायनिक ऑक्सिजन मागणी), ‘डीओ’ अर्थात डिझॉल्व्हड ऑक्सिजन (पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन) तपासले जाते. त्यांचा विचार करता इंद्रायणी नदीतील बीओडी, सीओडी आणि ‘डीओ’च्या प्रमाणात मानांकनापेक्षा खूप तफावत आहे.

महापालिकेचा दावा

महापालिकेच्या पर्यावरण अहवालानुसार, इंद्रायणी नदीतील पाण्याचे चिखली व चऱ्होली येथील आणि येथीलच सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील पाण्याचे नमुने तपासले. त्यामुळे बीओडी, सीओडी व डीओचे प्रमाण आढळले. पाण्यावर प्रक्रिया करण्यापूर्वी तीनही घटकांचे प्रमाण मानांकापेक्षा अधिक असून प्रक्रियेनंतरच्या पाण्यात मानांकानुसार गुणवत्ता राखली जाते.

महापालिकेमार्फत शहरातील सर्व १४ सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील (मैलाशुद्धीकरण) पाणी मोनेरा लॅब या अधिकृत राष्ट्रीय परीक्षण प्रयोगशाळा बोर्डामार्फत दैनंदिन संकलित करून त्याची रासायनिक तपासणी केली जाते.

यासाठी तळवडे बंधारा, तळवडे-चाकण पूल, तळवडे स्मशानभूमी, शेलारवस्ती, चिखली स्मशानभूमी, चिखली मोई पूल, रिव्हर रेसिडेन्सी, मोशी टोल नाका, सस्ते वस्ती बंधारा, डुडुळगाव स्मशान भूमी, ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर, चऱ्होली दाभाडे वस्ती पूल, चऱ्होली सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या अगोदर व नंतर, निरगुडीगाव येथील नमुने घेतले जात असल्याचा असा दावाही महापालिकेने केला आहे.

शिवाय, इंद्रायणी नदीला मिसळणाऱ्या नाल्यांमध्ये जाणारे थेट घरगुती सांडपाणी, घनकचरा व औद्योगिक सांडपाणी यामुळे नाल्यांतील पाण्यांची गुणवत्ता ढासळलेली दिसत असल्याचेही महापालिकेने नमूद केले आहे.

नद्यांमध्ये रसायनयुक्त पाणी सोडणाऱ्यांवर महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियंत्रण नाही. प्रदूषण करणाऱ्यांना शोधून काढले जात नाही. त्यामुळे नदी नष्ट होत चालली आहे. लवकरात लवकर दोषींना शोधून कारवाई करायला हवी.

- राजीव भावसार, पर्यावरणप्रेमी

कंपन्यांसह घरगुती सांडपाणीही मोठ्या प्रमाणात इंद्रायणीमध्ये जात आहे. महापालिका हद्दीसह नदीच्या उत्तरेकडील गावांचे पाणीही नदीत मिसळते. त्यावर उपाययोजना करण्यासाठी महापालिका व पीएमआरडीएने एकमेकांकडे बोट दाखविण्याऐवजी परिणामकारक कृती आराखडा करायला हवा.

- डॉ. नीलेश लोंढे, पर्यावरणप्रेमी

प्रदूषण नियंत्रण मंडळाची मानांकने

बीओडी : <=१० मिलिग्रॅम प्रतिलिटर (पाण्यात बीओडीचे प्रमाण जेवढे कमी तेवढे पाणी शुद्ध मानले जाते)

सीओडी : <=५० मिलिग्रॅम प्रतिलिटर (पाण्यातील रासायनिक पदार्थाचे विघटन करण्यासाठी किती ऑक्सिजनची आवश्यकता आहे, यावरून सीओडीचे प्रमाण निश्चित होते)

डीओ : दोन मिलिग्रॅम प्रतिलिटर (पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण जितके जास्त, तितकेच ते पाणी शुद्ध मानले जाते.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

चाकूने गळा चिरून महिलेची हत्या; अहिल्यानगर जिल्हा हादरला, नवऱ्याचे शेजारच्यांना फाेन, दरवाजा उघडला अन् धक्काच बसला..

'नगर तालुक्यातील कांदा व्यापाऱ्याची ८२ लाखांची फसवणूक'; अनेक दिवस कांदा खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला अन्..

दुर्दैवी घटना! 'बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू'; संगमनेर तालुक्यातील घटना, आईचा काळीज पिळवटणारा आक्राेश, अंगणात खेळत हाेता अन्..

SCROLL FOR NEXT