पिंपरी-चिंचवड

मावळातील 'ती' एकमेव शवदाहिनी, मात्र आता तेथेही...

गणेश बोरुडे

तळेगाव स्टेशन (ता. मावळ) : मावळात एकमेव तळेगावात बनेश्‍वर स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी आहे. परंतु, कंत्राटदाराचे दुर्लक्ष आणि गॅस तुटवड्यामुळे ती प्रभावीपणे काम करत नाही. त्यामुळे ऐन कोरोनाच्या काळात हा चर्चेचा विषय ठरत आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेतर्फे २०१३ मध्ये तळेगावातील बनेश्‍वर स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी उभारण्यात आली. मात्र, आठ महिन्यांपूर्वीच तिचे नगरपरिषदेकडे हस्तांतरण करण्यात आले. रोटरीने जवळपास साडेसहा वर्षे प्रभावीपणे चालवलेली ही शवदाहिनी नगरपरिषदेकडे हस्तांतरण केल्यानंतर घरघर लागल्याचे चित्र आहे. गॅस तुटवड्यामुळे ऐन कोरोनाच्या काळात अडचणी येत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे मृतदेह गॅस अथवा विद्युत दाहिनीत जाळण्याचे प्रशासनाचे संकेत आहेत. मावळ तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, मृत्यूचे प्रमाणही लक्षणीय आहे. एक मृतदेह जाळल्यानंतर तीन ते चार तासांनंतरच दुसरा मृतदेह जाळता येतो. त्यामुळे तीनपेक्षा अधिक मृतदेह आल्यास पुढच्यांना प्रतीक्षा करावी लागते. अशा परिस्थितीत जर गॅस संपला, तर पुढची कल्पनाच करायला नको, अशी भावना कोरोनाबाधित मयतांचे नातेवाइकांनी व्यक्त केली. 

दहा सिलिंडरचे दोन गॅस बँक गरजेचे असताना कधीकधी एकही गॅस बँक भरलेली नसते. बऱ्याच वेळा सुट्या सिलिंडरवर शवदाहिनी चालवली जाते. त्यामुळे ऐनवेळी गॅस संपल्यास पळापळ होते. याचाच प्रत्यय शुक्रवारी (ता. ७) गॅस संपल्यामुळे आला. सुरुवातीला गॅस नसल्यामुळे मृतदेह जाळण्यासाठी असमर्थता दाखवण्यात आली. त्यामुळे एका कोरोनाबाधित मयताच्या अंत्यसंस्काराला बराच उशीर झाला. ही परिस्थिती कळाल्यानंतर तळेगावातील एका समाजसेवकाने ऐनवेळी दुचाकीवर सिलिंडर पाठवल्याने सोय झाली. सध्या मावळातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे अंत्यसंस्कार येथे केले जातात. मात्र, नगरपरिषदेने नेमलेला संबंधित कंत्राटदार हलगर्जीपणा करत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. नगरपरिषदेसह तहसीलदार कार्यालयाने याप्रकरणी लक्ष घालून तळेगावातील शवदाहिनीचा प्रश्‍न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विल्हेवाट लावण्यासाठी ‘एवढा’ वेळ

 एका मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी किमान चार तास जातात. गॅस शवदाहिनीत समन्वयाअभावी व अधूनमधून गॅस तुटवड्यामुळे आम्हाला ताटकळत थांबावे लागते. किमान कोरोना काळात तरी यात सुधारणेची गरज आहे, असे कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारे संदीप खालकर यांनी व्यक्त केली. 

शवदाहिनीसाठी आवश्यक किमान गॅससाठा ठेऊन दैनंदिन देखभालीच्या सूचना संबंधित कंत्राटदारास दिल्या आहेत. वाढत्या मृतदेहांची संख्या लक्षात घेता तालुका आपत्कालीन कक्षाकडेही वाढीव गॅस बँकसाठी प्रयत्नशील आहे. 
- दीपक झिंजाड, मुख्याधिकारी, तळेगाव दाभाडे 

काय आहेत समस्या? 

- शवदाहिनीकडे कत्रांटदाराचे दुर्लक्ष 
- गॅस तुटवडा, समन्वयाचा अभाव 
- मृताच्या विल्हेवाटासाठी विलंब 
- वाढीव गॅस बँकची गरज 

Edited by Shivnandan Baviskar
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT