A Woman Died after giving birth to twins at YCM Hospital  
पिंपरी-चिंचवड

कोरोनामुळे अवघ्या 24 तासात जुळ्यांनी हरवले आईचं छत्र, वायसीएम हॉस्पिटलमधील घटना

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पुणे - कात्रजमध्ये राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला आणि अवघ्या २४ तासात ती जग सोडून गेली. तिचा कोरोनोमुळे मृत्यू झाल्याने त्या चिमुकल्या जन्मतःच पोरक्या झाल्या आहेत. त्यांच्या डोक्यावरच आईचं छत्र हरपल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. या प्रसूत महिलेच्या मृत्यूने भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोना वाढला, असे आरोग्य विभागाचे मत आहे. 

गेल्या ४ एप्रिल रोजी ही गर्भार महिला पोटात दुखत असल्याने प्रसुतीसाठी कै. यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयात दाखल झाली. तिला प्रसूती विभागात दाखल केले असता काळात रक्तदाब वाढतो म्हणून तो नियंत्रण करण्यासाठी उपचार सुरु केले. पण तिला पोटात दुखणे आणि श्‍वास घेण्यासह रक्तदाबाचाही त्रास सुरु झाला होता. ऑक्सिजन पातळी खालावली होती. श्‍वास घ्यायला त्रास होत त्रास असल्याने तिची कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आले. अॅन्टीजेन चाचणी केली. तिचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर आरटीपीसीआर चाचणी केली. पण त्या दरम्यान ५ एप्रिल रोजी सिझेरियन करून दोन जुळ्या मुलींना जन्म दिला.

दुकाने बंद केल्याने व्यापारी चिडले, दादरमध्ये कडक शब्दात निषेध


आज (ता.६)सकाळच्या सुमारास उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान गेल्या काही महिने शहरात कमी झालेला कोरोना पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे तिची कोणतीही प्रवासाची माहिती नाही. त्यामुळे तिला कोरोनाची लागण कशी झाली. याबाबत निश्‍चित कोणतीही माहिती नाही. मात्र तिच्या मृत्यूमुळे दोन जुळ्या मुलीच्या डोक्यावरचे आईच छत्र हरवले आहे. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून दिवसाला २ हजार रुग्णसंख्या सापडत असल्याने आरोग्य विभाग धास्तावला आहे. 

याबाबत लेबर रूमच्या परिचारिका मंगल सुपे म्हणाल्या, त्या महिलेची बिकट परिस्थिती होती. प्रसूती केली नसती, तरी महिलेचा जीव धोक्यात होता. तिच्या बाळांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhosari Purandar Airport : भोसरीतून थेट पुरंदर विमानतळापर्यंत भुयारी मार्गाची योजना; ‘पाताळ लोक’ प्रकल्पासाठी पुणे महापालिकेने उचलले पुढचे पाऊल

Kimberly Powell: कोण आहेत एनव्हिडियाच्या सीईओची 'विकेट' घेणाऱ्या किंबर्ली पॉवेल? इंटर्न ते थेट कंपनीच्या उपाध्यक्षा

Nvidia CEO Exit: ३३ वर्षांच्या प्रवासाला २ अफेअर्समुळे 'ब्रेक'! जगातील बलाढ्य कंपनीच्या सीईओचा तडकाफडकी राजीनामा; एआय जगताला हादरा

Khopoli Bus Accident : बाजारपेठेत अर्धा किलोमीटर मृत्यूचा थरार! अनियंत्रित बसने अनेक वाहनांना उडवले; एका तरुणाचा करुण अंत!

AI Cancer Cure: पुढील १० वर्षांत कर्करोग इतिहासजमा होणार? अँथ्रोपिकच्या प्रमुखांची मोठी भविष्यवाणी

SCROLL FOR NEXT