पिंपरी-चिंचवड

नोकरदार महिलांना करावी लागतेय दुहेरी कसरत, लॉकडाउनमध्येही नव्हती उसंत

सुवर्णा नवले

पिंपरी : गेल्या चार महिन्यांपासून महिलांना नोकरी, संसार अन्‌ मुलाबाळांची जबाबदारी, अशा तिहेरी भूमिकेतून कसरत करावी लागत आहे. उच्चपदावर कार्यरत असूनही पारंपरिक बुरसटलेल्या मानसिकतेमुळे घरातील कुटुंबीयांकडून मदतीचा हात मिळत नसल्याचे वास्तव चित्र आहे. दिवसभर कंबर कसूनही लॉकडाउनमध्ये पुरुषमंडळी व कुटुंबातील इतर सदस्यांनी अद्याप घरगुती कामात एकजूट दाखविली नसल्याची खंत 'ती'च्या मनाला बोचत आहे. तर क्‍वचित ठिकाणी पुरुषांनी घरातल्या स्वयंपाक घराचा ताबा घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे नोकरदार योद्धा महिलांच्या घुसमटीला वाट मिळणार कधी हा प्रश्‍न अनेकींना सतावत आहे. 

कोरोनासारख्या भयाण संकटात एकीकडे नोकरीची जबाबदारी आहे. कामाच्या वाढत्या व्यापामुळे मानसिक संतुलन सांभाळणे महिलांना कठीण झाले आहे. नोकरीसाठी घड्याळाच्या काट्यावर घराबाहेर पडणे. स्वतः:चा जेवणाचा डबा बनविण्यापासून घरातल्या सर्वांची जबाबदारी उचलणे. प्रत्येकाला हवं ते नको पाहून दुसऱ्या दिवसाच्या स्वयंपाकाची अर्धी तयारी करणे हा महिलांचा नित्यक्रम झाला आहे. काही कुटुंबामध्ये गिरणीत जाणे, भाजीपाला व किराणा आणणे अशी किरकोळ कामे पुरुष मंडळी करीत आहेत. मात्र, आजही घामाने डबडबलेल्या अवस्थेत स्वयंपाक घरात महिलांच्या मदतीला हात धावून येत नाहीत. त्यामुळे नोकरदार महिलांच्या नाकीनऊ आले आहेत. महिलांचे आजारपण, चार दिवसांची मासिकपाळी या कालावधीतही त्यांना कामावर हजेरी लावूनही घरी दिलासा मिळत नसल्याची उणीव भासत आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोर्टमध्ये कमी प्रमाणात कामकाज सुरू असल्याने वकिली पेशाच्या महिला घरात आहेत. कामाचा व्याप कमी आहे. मात्र, घरातील कामाचा ताण दुपटीने वाढला आहे. बॅंका, निमशासकीय व शासकीय सेवेत तसेच पोलिस खात्यात काम करणाऱ्या महिला जीव मुठीत घेऊन काम करीत आहे. संसर्गजन्य परिस्थितीत घरातील ज्येष्ठ मंडळी व लहान मुलांच्या जिवाची भीती त्यांना सतावत आहे. काहींना नोकरी सोडून दे इथपर्यंत ऐकावे लागत आहे. अशा परिस्थितीत नोकरदार महिला दररोज अंघोळ करणे, कपडे धुणे व शरीर सॅनिटाइज करण्याच्या या प्रक्रियेला कंटाळून गेल्या आहेत. दिवसभरात ना-ना प्रकारचे नागरिक भेटतात. काळजी घेऊनही वेळ सांगून येत नसल्याने त्यांच्या बरोबर कुटुंबीयांनाही लागण होण्याची भीती त्यांना सतावत आहे. आजूबाजूला दररोज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कानावर पडत आहे. मात्र, नोकरी हे आद्यकर्तव्य असल्याने त्या हतबल झाल्या आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मनोधैर्य व पाठबळाची गरज... 

अत्यावश्‍यक सेवेत काम करणाऱ्या डॉक्‍टर, नर्स व स्वच्छता कर्मचारी महिलांनाही भयाण संकटाचा सामना करावा लागत आहे. कित्येक महिला घरी न जाता कामावरच क्वारंटाइन होत आहे. या महिलांच्या घरात सद्यःस्थितीत कुटुंबीय मदत करीत आहेत तर काही जणांनी घरकाम करणाऱ्या महिलांवर घराची जबाबदारी सोपविली आहे. घरकाम करणाऱ्या महिलांनाही सोसायटी परिसरात व घरांमध्ये अद्यापपर्यंत 'नो एंट्री' असल्याने महिला पिळवटून गेल्या आहेत. दिवसभराच्या व्यस्त कामातून उसासा मिळत नसल्याचे चित्र आहे. कोरोना हद्दपार होऊन नेहमीप्रमाणे दिनचर्या सुरू होण्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT