this year delay for paddy cultivation In Maval taluka  
पिंपरी-चिंचवड

मावळ तालुक्यात यंदा भातलावणी रखडलेली कारण....

सकाळ वृत्तसेवा

बेबडओहोळ(पुणे) : पाऊस सुरू होताच भात लावणी करण्यासाठी अग्रेसर असणारी गावे, यंदा भातलावणीसाठी रखडलेली आहेत. शिळिंब, जवण या गावात गावात अद्याप भातलावणी सुरू असल्याचे चिञ दिसत आहे. अश्या भातरोपांची कढवाणावरून वाहतूक करताना शेतकरी दिसत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पाऊस सुरू होताच धरण क्षेत्रातील गावे भात लावणीमध्ये पुढे असतात. मोठ्या प्रमाणात या भागात पाऊस पडल्याने लवकर भात लावायला येतात, पण यंदा या गावातीलही परीस्थिती वाईट आहे. आज घडीला देखील जवन, शिळिंब या गावातील शेतकरी भात लावणीसाठी कढवाणावरूण भात रोपांची वाहतुक करताना दिसत आहे. भात वाहतूकीच्या या पध्दतीला पश्चिम पट्ट्यात कढवाण हा शब्द वापरतात तर पुर्व पट्ट्यातील शेतकरी गाढवाण हा शब्द वापरतात. भातखाचापर्यंत कुठलेही वाहतूकीचे साधण जात नसल्याने शेतकरी काढवाणातून जास्तीत जास्त वापर करतात. आजही हिच पध्दत अतीदुर्गम भागात वापरली जाते.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मावळ तालुका भात पिकासाठी म्हणून राज्यात ओळखला जातो. त्यातल्या त्यात इंद्रायणी भातासाठी तर सर्वात जास्त, पण यंदा निसर्गचक्रात मोठा बदल झालेला तालुक्यात पहावयास भेटत आहे. महिनाभर पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांनी भातपिके थोड्याफार पावसावर तर नदीच्या पाण्यावर जगवली आहे, पण पाणी देणार तरी किती यामुळे भात पिक चांगलेच संकटात सापडले आहे.

यंदा म्हणावं तेवढा पाऊस होताना दिसत नसल्याने भात रोपांना त्याप्रमाणात तेज नसल्याचे सर्वञ दिसत आहे. कुठे भातरोपे पाण्याविणा पिवळी पडलेली तर कुठे सुकून जातानाचे चिञ दिसत आहे. या उलट पाण्याची कुठलीही सुविधा नसल्याने पावसावरच अवलंबुन असणारे शेतकऱ्यांनी अजुन भात लावणी केलेली नाही. रोज पाऊस पडणाऱ्या आशेवर हे शेतकरी बसुन राहिले आहे. भात खाचरे पाण्याने भरले नसल्याने यंदा केलेली सर्व मेहनत वाया जाण्याची चिन्ह दिसुन लागली आहे. यामुळे अजुनही शेतकरी भातलागवड करतानाचे चिञ पवन मावळातील गावांमध्ये दिसत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : महाराष्ट्रातल्या राजुरा मतदारसंघात व्होटचोरी करून निवडून आला भाजप आमदार? राहुल गांधींनी आकडेवारीच मांडली

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : कर्नाटकमध्ये मतचोरी पकडल्याचे राहुल गांधी यांनी पुरावे केले सादर

Pune Crime : कोथरुडमध्ये गोळीबार; गाडीला साईड न दिल्याचा वाद की काहीतरी मोठं?

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT