प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, पिंपरी - ‘सकाळ’ विद्या आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ यांच्यातर्फे आयोजित चर्चासत्रात सहभागी झालेले मान्यवर. (डावीकडून) डॉ. ललित वधवा,  प्रा. महेंद्र सोनवणे, डॉ. शीतलकुमार रवंदळे,  
पिंपरी-चिंचवड

नोकरी हवीय, तर महाविद्यालय योग्य निवडा

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - ‘विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीच्या चांगल्या संस्थेच्या महाविद्यालयाची निवड करणे आवश्‍यक आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करताच कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून नोकरीच्या संधी उपलब्ध होतील,’ असा सल्ला डॉ. शीतलकुमार रवंदळे यांनी विद्यार्थी आणि पालकांना दिला.  

‘सकाळ’ विद्या आणि पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ यांच्यातर्फे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळूनच चर्चासत्राला सुरुवात झाली. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने कशी होणार आहे? प्रवेशाच्या किती फेऱ्या होणार व कशा होणार? ही प्रक्रिया कधीपर्यंत चालेल? आणि महाविद्यालये नेमके कधी सुरू होतील. या बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पीसीईटी व नूतन ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, डॉ. ललित वधवा, ‘सकाळ’ पिंपरी-चिंचवड कार्यालयाचे जाहिरात मुख्य व्यवस्थापक मिलिंद भुजबळ उपस्थित होते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डॉ. रवंदळे म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी सीईटी किंवा जेईईच्या गुणांच्या (पर्सेंटाईल) आधारे कॉलेजची प्राथमिकता निवडली पाहिजेत. त्यावरच तुम्ही नेमक्‍या कोणत्या शाखेत प्रवेश घेऊ शकता किंवा नेमके कोणत्या शाखेत ‘स्कोप’ आहे, याची माहिती घेणे आवश्‍यक ठरते. यावर्षी पीसीएममध्ये ४५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बीव्होकमध्ये (व्होकेशनल) चांगले पर्याय उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी विविध शिष्यवृत्तीचा लाभ घेतला पाहिजे. प्रत्येक ब्रांचला स्कोप असल्याने सध्या ज्या कॉलेजचे ‘कॅम्पस प्लेसमेंट’ चांगले आहे. अशांना प्राधान्य देणे आवश्‍यक आहे. कारण आता विविध कंपन्यांकडून स्किलनुसार मागणी होत आहे.  डॉ. महेंद्र सोनवणे यांनी ‘आर्किटेक्‍चरमधील करिअर, प्रवेश व कॉलेजचे पर्याय’ यावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘आर्किटेक्‍चर साधे वाटत असले तरी सोपे नाही. कारण त्यामध्ये तुमच्या कौशल्याला महत्त्व असते. पुस्तकी ज्ञानाबरोबर नावीन्यपूर्ण कल्पनांची जोड मिळाल्यावर एखादा प्रोजेक्‍ट युनिक बनू शकतो. आर्किटेक्‍चरला अधिकृत परवाना असतो. त्याचे रजिस्टेशन करावे लागते. एक चूक झाली तरी परवाना रद्द होऊ शकतो.’

प्रा. विजय नवले म्हणाले, ‘कोरोना काळातदेखील विद्यार्थ्यांना असंख्य करिअरची पर्याय उपलब्ध आहेत. वैद्यकीय क्षेत्रालादेखील अभियांत्रिकी आधारभूत आहे. आता प्रत्येक क्षेत्राच्या शाखेत अभियांत्रिक अंतर्भूत असल्याचे दिसते. मुलींना मेकॅनिकल, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्येही चांगला स्कोप आहे. नव्या टेक्‍नॉलॉजीचा वापर करून त्या यशस्वी होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करताना कॉलेजचे ऑप्शन हे उतरत्या क्रमाने दिले पाहिजेत. पालकांनी सर्वसमावेशक विचार करूनच निर्णय घेतला पाहिजे.’’ दरम्यान, ऑनलाइन फॉर्म भरताना होणाऱ्या चुका कशा टाळाव्यात याचे प्रात्यक्षिक प्रा. मनीषा देशपांडे व प्रा. केतन देसले यांनी दिले. स्वाती देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT