Matoshreet Shiv Sena chief Uddhav Thackeray giving a letter about the organization, former mayor Bhagwan Karankal.
Matoshreet Shiv Sena chief Uddhav Thackeray giving a letter about the organization, former mayor Bhagwan Karankal. esakal
Politics | राजकारण

2 आमदार निवडीची शिवसैनिकांमध्ये ताकद : भगवान करनकाळ

सकाळ वृत्तसेवा

धुळे : जिल्ह्यात दोन आमदार निवडून आणण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे. येते २०२४ वर्ष समोर ठेऊन सर्व निष्ठावंतांना सोबत घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv sena chief uddhav thackeray) यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिवसैनिक ही ताकद सिद्ध करुन दाखवतील, असा विश्वास माजी महापौर तथा शिवसेनेचे जिल्हा संघटक भगवान करनकाळ यांनी व्यक्त केला. (ex mayor Bhagwan Karankal statement to uddhav Thackeray about shiv sena MLA dhule Latest Marathi news)

श्री. करनकाळ यांनी मुंबईत मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर पत्रकाद्वारे सांगितले, की पडझडीच्या काळात जिल्हा शिवसेना नव्या जोमाने, नव्या ताकदीने उभी करण्याचा संकल्प केला आहे.

जिल्हा संघटक म्हणून जी जबाबदारी दिली आहे, ते धनुष्यबाण उचलण्यासाठी ताकद दिली म्हणून श्री. ठाकरे यांचे आभार मानत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादामुळे आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रेरणेमुळे २००३ मध्ये मी धुळे महापालिकेचा शिवसेनेचा प्रथम महापौर झालो.

त्याआधी सलग तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आलो, नगराध्यक्ष झालो. ही सारी किमया शिवसेनेच्या परिस्पर्शामुळे झाली. शिवसेनेने ज्यांना मोठे केले, पद प्रतिष्ठा, पैसा नाव मिळवून दिले. त्यांनी पक्षप्रमुखांची बेईमानी केली.

अशा स्थितीत आजही लाखो निष्ठावंत शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत व कायम राहतील. पक्षप्रमुखांच्या भेटीप्रसंगी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख धीरज पाटील आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कल्याणमधून श्रीकांत शिंदे अर्ज भरणार, जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT