Aai Kuthe Kay Karte Esakal
Premier

Aai Kuthe Kay Karte: "आशुतोषचं जाणं अनेकांना आवडलं नाहीये..."; 'आई कुठे काय करते'मधील मधुराणीची भावूक पोस्ट

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) यांनी मालिकेतील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मालिकेबद्दल नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.

priyanka kulkarni

Aai Kuthe Kay Karte: छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत विविध ट्विस्ट येत असतात. काही दिवसांपूर्वी या मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे. अरुंधतीचा दुसरा पती आशुतोषचं निधन झालं आहे. त्यामुळे आता अरुंधतीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मालिकेत अरुंधती ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Gokhale Prabhulkar) यांनी मालिकेतील या ट्विस्टबाबत नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मधुराणी यांनी आशुतोषसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला त्यांनी दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

मधुराणी यांची पोस्ट

मधुराणी यांनी आशुतोषसोबतचे फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "मधले काही दिवस कोणतीही पोस्ट करायच्या मनस्थितीमध्ये नव्हते त्यामुळे ही उशीराने डकवतेय.आशुतोषचं 'जाणं ' अनेकांना आवडलं नाहीये...कसं आवडेल.... ! आयुष्यात घडणाऱ्या अप्रिय घटना आवडत नाहीतच आपल्याला, पण स्वीकाराव्या लागतातच. तसंच आशुतोष जाणं आपल्याला स्वीकारावं लागेल."

"गेले अनेक दिवस दुखवट्याचे सीन्स करते आहेत. 12/13 तास सलग असे काही दिवस रडते आहे. ! अभिनय अभिनय म्हंटलं तरी तुमच्यातला एक भाग तुम्ही ओतता, काही पणाला लावता तेव्हाच तो खरा वाटतो. हे काही दिवस प्रचंड थकवणारे होते इतके की त्याचा काही प्रमाणात तब्येतीवरही परिणाम झालाच. डेलीसोपमध्ये भावनिक व्यवस्थापन करण्यासाठी बऱ्याचदा वेळ मिळत नाही (unwind होण्यासाठी ) आणि त्याचे परिणाम दिसून येतात.", असंही मधुराणी यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं.

मधुराणी यांनी पुढे पोस्टमध्ये लिहिलं, "अरुंधती आशुतोषला मिस करतेय तशीच आम्हाला सगळ्यांना ओंकारची तितकीच आठवण येतेय. ओंकार, आपल्या फालतू पासून गंभीर विषयावरच्या गप्पा, 90s ची गाणी मोठमोठ्याने गाणं, विषय कुठलाही असो त्यातलं तुला सखोल माहीत असणं, आणि आजूबाजूचं वातावरण हसतखेळत ठेवायचं तुझं कसब हे सगळं मिस होतंय. पुढे परत काम करूच!! पण हा प्रवास कायम स्मरणात राहील!"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबईकरांचे वेळापत्रक कोलमडणार! पश्चिम रेल्वेवर १० तासांचा ब्लॉक, अनेक गाड्या रद्द, काहींच्या मार्गात बदल

SP Sandeep Singh Gill Statement : भोर नसरापूर चिमुकलीवर अत्याचार हत्याप्रकरणाचा एसपी संदीपसिंग गिल यांनी सांगितला घटनाक्रम

Maharashtra 12th Result 2026 : बारावीचा निकाल जाहीर! कोकण अव्वल, लातूर पिछाडीवर, मुलींचा यशाचा टक्का मुलांपेक्षा ६.३५ ने अधिक

Pune Bhor Child CCTV Video : पुण्यातील अत्याचार करून हत्या केलेल्या ४ वर्षीय चिमुकलीला नेताना सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

Latest Marathi News Live Update : मंगरूळ गावात पाणी टंचाईचा स्फोट; ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा

SCROLL FOR NEXT