Aboli sakal
Premier

Aboli: अबोली आणि अंकुशच्या आयुष्यात येणार नवा ट्विस्ट; 'हा' अभिनेता करणार मालिकेत एन्ट्री

Marathi Serial: श्रेयस मराठे ही भूमिका कोणता अभिनेता साकारणार? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

priyanka kulkarni

Aboli: छोट्या पडद्यावरील अबोली (Aboli) मालिकेचं कथानक आता अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवत न्याय मिळवून देण्याचा अबोलीने घेतलेला वसा अनेकांसाठी आशेचा किरण ठरतोय. नवनव्या केसचा छडा लावत असतानाच आता अबोलीच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. या नव्या पात्राचं नाव आहे श्रेयस सुमन मराठे. श्रेयस मराठे ही भूमिका कोणता अभिनेता साकारणार? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. अबोली या मालिकेत कोणत्या अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे? याबद्दल जाणून घेऊयात...

'या' अभिनेत्याची मालिकेत एन्ट्री

अबोली या मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेता माधव देवचके (Maadhav Deochake) हा श्रेयस सुमन मराठे हे पात्र साकारणार आहे. अबोलीच्या विरोधात श्रेयस केस लढणार आहे. या नव्या आव्हानाचा अबोली आणि अंकुश कसा सामना करणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल.

सुप्रसिद्ध अभिनेता माधव देवचके जवळपास 6 वर्षांनंतर स्टार प्रवाहच्या मालिकेत दिसणार आहे. याआधी देवयानी आणि गोठ या मालिकेत माधवने लक्षवेधी भूमिका साकारली होती. श्रेयस सुमन मराठे ही व्यक्तिरेखा देखिल हटके असेल. श्रेयसचं आपल्या आईवर प्रचंड प्रेम होतं. त्यामुळे नावासोबतच तो आईचही नाव लावतो. अतिशय हुशार, यशस्वी आणि हवी असणारी गोष्ट मिळवण्यासाठी वाट्टेल ते करणारा श्रेयस अबोली-अंकुशच्या आयुष्यात नेमकी कोणती उलथापालथ घडवणार? हे पहायचं असेल तर तुम्हाला न चुकता अबोली ही मालिका बघावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: पावसाने राज्याची चिंता वाढवली; पण पुढील वर्षासाठी गुड न्यूज! एल निनोबाबत ‘नोआ’नेमका काय वर्तवला अंदाज?

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

SCROLL FOR NEXT