Abhishek Bachchan  Esakal
Premier

Abhishek Bachchan : बोरिवलीमध्ये अभिषेक बच्चनने घेतली 'इतक्या' करोडची प्रॉपर्टी ; सोशल मीडियावर होतेय चर्चा

Abhishek Bachchan buys huge property in Borivali : अभिनेता अभिषेक बच्चनने बोरिवली भागात बरीच प्रॉपर्टी खरेदी केली आहे. सोशल मीडियावर याची चर्चा होतेय.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने बोरिवली भागातील ओबेरॉय स्काय सिटी प्रोजेक्टमध्ये जवळपास ६ अपार्टमेंट्सची प्रॉपर्टी विकत घेतली असून या प्रॉपर्टीची किंमत तब्बल १५.४२ करोड रुपये इतकी आहे. झॅपकी डॉट कॉमकडे आलेल्या प्रॉपर्टी रजिस्टरेशनच्या पेपर्सवरून ही बातमी लीक झालीये.

अभिषेकने खरेदी केलेली प्रॉपर्टी जवळपास ४,८९४ स्क्वेअर फिट कार्पेट एरिया असून ज्याची सध्या किंमत ३१,४९८ रुपये पर स्क्वेअर फिट आहे.

हे सहा अपार्टमेंट्स बिल्डिंगच्या ५७ व्या फ्लोअरवर असून ही बिल्डिंग बोरिवलीतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेजवळ आहे. हाती लागलेल्या कागदपत्रांनुसार हे फ्लॅट्स २८ मे २०२४मध्ये अभिषेकच्या नावावर रजिस्टर झाले असून त्याला जवळपास १० कार्स पार्क होतील इतकं पार्किंगही मिळालं आहे.

यातील दोन अपार्टमेंट्स २५२ स्क्वेअर फुटचे असून इतर दोन ११०० स्क्वेअर फूट आणि उरलेले इतर दोन १०९४ स्क्वेअर फुटाचे असल्याचं कागदपत्रांमध्ये नमूद केलं आहे.

या आधीही अभिषेकने मुंबईत अनेक प्रॉपर्टी विकत घेतल्या असून त्यातील दोन प्रॉपर्टी त्याने काही काळापूर्वीच विकल्या. एक प्रॉपर्टी त्याने जवळपास ४५.७५ करोड रुपयांना विकली. ही प्रॉपर्टी वरळीमध्ये होती आणि त्याने ही प्रॉपर्टी काही वर्षांपूर्वी ४१ करोड रुपयांना विकत घेतली होती.

त्याचे वडील अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणे अभिषेकही सिनेमात काम करण्याव्यतिरिक्त प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवणूक करण्यातही भर देतो असं म्हंटलं जातंय. बच्चन कुटूंबाच्या नावावर अनेक ठिकाणी जमीन आणि इतर मालमत्ता आहे. आतापर्यंत त्यांच्याकडे असलेल्या मालमत्तेची रक्कम कित्येक करोडच्या घरात आहे. शिवाय त्यांचे जुहू येथे असलेले जलसा आणि प्रतीक्षा या दोन बंगल्यांची किंमतही बरीच आहे.

आगामी प्रोजेक्ट्स

अभिषेकचे या वर्षी दोन प्रोजेक्ट्स रिलीज होणार आहेत. यातील त्याच्या एका फिल्मचं नाव 'बी हॅपी' असं असून या सिनेमाचं दिग्दर्शन रेमो डिसुझा करणार आहे तर दिग्दर्शक सुजित सरकार यांच्या आगामी सिनेमातही अभिषेक काम करत असून या सिनेमाचं नाव अजून ठरलं नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्येष्ठ नागरिक आक्रमक! 'डीजेमुक्त सोलापूरसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा'; डीजेग्रस्तांचा आवाज जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांच्या कानावर

Vice President Election 2025 : बहुमत नाही म्हणून एनडीएची विरोधी पक्षांना मतदानाची विनंती; उद्धव ठाकरेंच्या खासदाराचा दावा

Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मिरची होती का? जेवणात काय झणझणीत वापरत होते?

Bail Pola Festival 2025: आज आवतण घ्या, उद्या जेवायला या; खांदेमळणीने सुरू होणार कृषी संस्कृतीचा उत्सव बैलपोळा

Panchganga River : पंचगंगा नदी धोका पातळीपासून ३ इंच दूर; बावडा-शिये मार्ग बंद, नदीकाठी सतर्कतेचा इशारा, 'या' मार्गांवर वाहतूक बंद

SCROLL FOR NEXT