Gaurav More Esakal
Premier

Friendship Day Special : मित्राच्या आईसाठी धावून आलेला गौरव आणि डोंबारी मुलीला केलेली मदत ; मित्रांनी शेअर केली गौरवची अशीही बाजू

Gaurav More emotional side with friends : अभिनेता गौरव मोरे त्याच्या बिनधास्त अंदाजामुळे प्रसिद्ध आहे. पण आज फ्रेन्डशिपच्या डेच्या निमित्ताने गौरवाची भावनिक बाजू त्याच्या खास मित्रांनी शेअर केली.

सकाळ डिजिटल टीम

Gaurav More : महाराष्ट्राची हास्यजत्रा या सोनी मराठीवरील कार्यक्रमामुळे अभिनेता गौरव मोरे घराघरात पोहोचला. त्याचा बिनधास्त अंदाज, कमाल कॉमेडी सेन्स सगळ्यांना पसंत पडला. पण आज फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने एका मुलाखतीत त्याच्या खास मित्रांनी गौरवची इमोशनल बाजू शेअर केली.

राजश्री मराठीच्या कार्यक्रमात गौरव बरोबर त्याच्या दोन्ही खास मित्रांनी शशिकांत आणि राकेश यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी त्यांच्या मैत्रीचे खास किस्से, आठवणी शेअर केल्या. यावेळी शशिकांत आणि राकेश यांनी गौरवाविषयी भावना व्यक्त केल्या.

आईला असलेलं कौतुक

गौरवविषयी सांगताना शशिकांत म्हणाला कि, "गौरव कायम मदतीसाठी तत्पर असतो. तो खूप इमोशनल आहे. आमची मैत्री नवी होती. त्याने मला फोन केला होता. तर त्यावेळी माझ्या आईला छातीचा त्रास होता आणि मी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. गौरवला मी ते फोनवर सांगितलं तेव्हा तो लगेच हॉस्पिटलमध्ये आला. माझ्या आईला भेटला. तिच्या पाया पडला. माझ्या आईला अजूनही ते लक्षात आहे. तो माझ्या घरी बऱ्याचदा येतो पण प्रत्येकवेळी आई त्याच्याबरोबर फोटो काढते. एक सामान्य मुलगा आता इतका मोठा स्टार झाला याचं तिला खूप कौतुक आहे."

डोंबारी मुलीला केलेली मदत

तर राकेशने गौरवच्या प्रेमळपणाचा एक किस्सा सांगितला. त्याने सांगितलं कि,"एकदा आम्ही रस्त्यात उभे होतो तेव्हा रस्त्यात डोंबाऱ्याचा खेळ चालू होता. त्यात लहान मुलगी रश्शीवर चालत होते. तर तिची आई ढोलकी वाजवत होती आणि ती प्रेग्नेंट होती. तर त्या आईचं लक्ष हॉटेलकडे होतं. ते गौरवने पाहिलं आणि माझ्या हातात पैसे दिले. तो मला म्हणाला आज दिवाळी आहे हे पैसे घे आणि त्यांना काहीतरी खायला घेऊन दे. तो खूप इमोशनल आहे. लहान मुलांना असं बघून त्याला दुःख होतो. तो कायमच लोकांना मदत करतो."

गौरवचा 'अल्याड पल्याड' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला हा सिनेमा सुपरहिट झाला. अनेकांना त्याचा हा सिनेमा आवडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT