Actors are charging this much fee for Netflix show 
Premier

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Kapil Sharma is charging huge fees for his new show : अभिनेता, कॉमेडियन कपिल शर्मा सध्या त्याच्या गाजत असलेल्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो' साठी तगडी फी आकारतोय. जाणून घेऊया या कार्यक्रमात काम करणाऱ्या सगळ्या कलाकारांचं मानधन.

सकाळ डिजिटल टीम

Kapil Sharma: कॉमेडियन, अभिनेता कपिल शर्माचा नेटफ्लिक्सवर सुरु असलेला 'द ग्रेट इंडियन कपिल शो' चांगलाच चर्चेत आहे. आतापर्यंत या शोचे ५ एपिसोड्स नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाले आहेत. नुकतंच एका वृत्तसंस्थेने कपिल या शोसाठी आकारत असलेली फी उघड केली.

कपिल या शोसाठी तगडी फी आकारत असून या रिपोर्टमध्ये अर्चना पुरन सिंह आणि सुनील ग्रोव्हर यांच्या मानधनाविषयी खुलासा करण्यात आला आहे.

झी हिंदुस्थानच्या वृत्तानुसार आणि डीएनए इंडियाच्या हवाल्याने कपिलने आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या पाच एपिसोड्ससाठी २६ करोड इतकी फी आकारल्याचं सांगण्यात येतंय. याचा अर्थ कपिल एका एपिसोडसाठी पाच करोडहुन अधिक फी आकारत आहे.

तर अभिनेता सुनील ग्रोव्हर सहा वर्षानंतर कपिल सोबत काम करतोय आणि त्याला प्रत्येक एपिसोड मागे २५ लाख रुपये मानधन मिळत आहे. यासोबतच अर्चना पुरन सिंह आणि शोमधील इतर कलाकारांचंही मानधन यावेळी रिव्हील करण्यात आलं.

या शोमध्ये परीक्षक म्हणून वावरणाऱ्या अर्चना पूरन सिंह या प्रत्येक एपिसोडमागे १० लाख रुपये फी आकारत आहेत तर कृष्णा अभिषेक १० लाख रुपये, किकू शारदा ७ लाख रुपये आणि राजीव ठाकूर ७ लाख रुपये इतकी फी प्रत्येक एपिसोडमागे आकारत असल्याचं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय. पण याबाबतची कोणतीही पुष्टी नेटफ्लिक्स इंडिया किंवा कपिलच्या टीमकडून करण्यात आली नाहीये.

३० एप्रिलला नेटफ्लिक्सवर सुरु झालेल्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो' या कार्यक्रमात आतापर्यंत अनेक सेलिब्रिटीजनी हजेरी लावली आहे. पहिल्या एपिसोडला रणबीर कपूर, नीतू कपूर आणि रिधिमा सहानी यांनी हजेरी लावली. हा एपिसोड सगळीकडे गाजला होता.

त्यानंतर विकी कौशल, सनी कौशल, दिलजीत सिंह, परिणीती चोप्रा, आमिर खान, इम्तियाज अली, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी हजेरी लावली आहे तर पुढच्या एपिसोडमध्ये सनी देओल आणि बॉबी देओल हजेरी लावणार आहेत.

दरम्यान, द ग्रेट इंडियन कपिल शोच्या निमित्ताने कपिल आणि सुनील सहा वर्षांनंतर एकत्र काम करत आहेत. त्यांच्यात सात वर्षांपूर्वी काही कारणांमुळे वाद झाला होता. त्यानंतर सुनील ग्रोव्हर 'द कपिल शर्मा शो' सोडला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT