Kartik Aaryan in Chandu Champion Esakal
Premier

Chandu Champion : प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी रिलीज होणार 'चंदू चॅम्पियन'चा ट्रेलर; चित्रपटातील 'त्या' सीनचं सिक्रेट कार्तिकने केलं उघड

Kartik shared important update about Chandu Champion movie trailer : अभिनेता कार्तिक आर्यनने त्याच्या आगामी चंदू चॅम्पियन सिनेमाच्या ट्रेलरबाबत महत्त्वाची अपडेट शेअर केली.

सकाळ डिजिटल टीम

अभिनेता कार्तिक आर्यनच्या आगामी चंदू चॅम्पियन या सिनेमाची चर्चा बराच काळ सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. कधीही हार न मानणाऱ्या एका अॅथलिटची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

आता या सिनेमाच्या ट्रेलरची रिलीज डेट सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली अभिनेता कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून ट्रेलरची रिलीज डेट जाहीर केली.

कार्तिकने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये चंदूच्या हातात बंदूक दिसत असून तो युद्धभूमीवर लढताना दिसतोय. यावरून एका अॅथलिट सोबत कर्तव्यदक्ष सैन्याधिकाऱ्याची भूमिका बजावतानाही कार्तिक या सिनेमात दिसणार आहे असा अंदाज पोस्टरवरून येतोय. उद्या म्हणजे 18 मे 2024 ला सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमात कार्तिकने एक आठ मिनिटांचा युद्धाचा सीन शूट केलाय. त्या सीनमधील फोटो त्याने या पोस्टरवर शेअर केलाय.

"The proudest moment of my career so far- playing a soldier of the Glorious Indian Army ,one of the many facets of Chandu Champion’s life !! Glimpse of the 8 min long single take War Sequence Salute to the Indian Armed Forces ! #ChanduChampion 🇮🇳💪🏻 Trailer out tomorrow 🙏🏻," (माझ्या आतापर्यंतच्या करिअरमधील सगळ्यात गौरवाचा क्षण- चंदू चॅम्पियनच्या आयुष्यातील अनेक पैलूंपैकी एक; गौरवशाली भारतीय सेनेतील एका सैनिकाची भूमिका मी निभावतोय. 8 मिनिटांच्या सिंगल टेक युद्धाच्या शूटिंगमधील सिक्वेन्सची एक झलक. भारतीय सैन्याला माझा सलाम. ) असं कॅप्शन कार्तिकने या पोस्टला दिलंय.

कार्तिकने शेअर केलेल्या या पोस्टरवर अनेकांनी कमेंट करत ते ट्रेलर बघण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हंटलं तर त्याच्या चाहत्यांच्या मनात कार्तिकने शूट केलेल्या या सिंगल टेक युद्धाच्या सीनविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असेल हे नक्की.

14 जून 2024 ला रिलीज होणाऱ्या या सिनेमाचं दिग्दर्शन कबीर खान यांनी केली असून कार्तिकने चंदू चॅम्पियन या भूमिकेसाठी फिटनेसवर खूप मेहनत घेतली आहे. कधीही हार न मानणाऱ्या एका खऱ्या क्रीडापटूच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा असल्याची चर्चा आहे.

IND vs AUS T20I: भारत - ऑस्ट्रेलिया वनडे मालिका संपली आता सुरू होणार टी२० मालिकेचा थरार; पाहा संपूर्ण वेळापत्रक

'12 वाजून 56 मिनिटांनी त्याचा मेसेज आला...' सतीश शाह यांचा निधनापूर्वी केलेला सचिन पिळगांवकरांना मॅसेज, म्हणाले...'सतीश आणि मी... '

Latest Marathi News Live Update : 'हे लोक आधीच जनतेला गोंधळात टाकत आहेत...'-मनोज तिवारी

Accident News : दुर्दैवी अपघात! गिरनारला देवदर्शनासाठी जात असताना बडोद्यात सांगलीच्या दोघांचा जागीच मृत्यू

पक्ष भाजपमध्ये विलीन करा, मोदी-शहांनी शिंदेंना आदेश दिल्याचा राऊतांचा दावा; दिल्ली दौऱ्यावरून टीका

SCROLL FOR NEXT