Kalki 2898 Esakal
Premier

Kalki 2898 AD : ठरलं ! या दिवशी रिलीज होणार प्रभासच्या बहुप्रतीक्षित कल्की सिनेमाचा ट्रेलर

Kalki 2898 Ad's release date announced : बहुप्रतीक्षित कल्की सिनेमाच्या ट्रेलरची रिलीज डेट सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली.

सकाळ डिजिटल टीम

Kalki 2898 Ad Trailer : 'बाहुबली' फेम प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हसन आणि दीपिका पदुकोण यांची मुख्य भूमिका असलेल्या 'कल्की 2898 AD' सिनेमाची चर्चा सध्या सगळीकडे आहे. काही ना काही कारणामुळे सिनेमाचं प्रदर्शन बराच काळ रखडलं होतं पण अखेर हा सिनेमा लवकरच रिलीज होणार असून नुकतीच सोशल मीडियावर सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली.

प्रभासने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर सिनेमाचं नवीन पोस्टर शेअर केलं. या पोस्टरमध्ये एका मातीच्या ढिगाऱ्यावर उभा राहिलेला प्रभास दिसत असून त्याच्यामागे इमारती आणि एक अदृश्य ढाल दिसतेय. तर त्याने शरीरावर भैरव कवच चढवलेलं दिसत आहे. या पोस्टरला 'आता भविष्य उलगडणार ! १० जूनला ट्रेलर येतोय' असं कॅप्शन देण्यात आलं आहे. प्रभास या सिनेमात भैरवा ही भूमिका साकारणार आहे.

अनेकांनी कमेंट करत प्रभासच्या लूकचं कौतुक केलं आणि त्याचा हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं सांगितलं.

तर अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्या सिनेमातील लूकमधील पोस्टर शेअर करत सिनेमाचा ट्रेलर १० जूनला रिलीज होत असल्याची घोषणा केली. या पोस्टरमध्ये अमिताभ यांच्या एका हातात काठी दिसत असून एका हातात तलवार दिसत आहे. तर लांब केस आणि अंगाभोवती गुंडाळलेलं वस्त्र, कपाळावरील मण्यातून निघणारं तेज लक्ष वेधून घेतंय. अमिताभ या सिनेमात अश्वत्थामा ही भूमिका साकारणार असून त्यांच्या भूमिकेचा टीझरही गाजला होता.

या व्यतिरिक्त या सिनेमात दीपिका पदुकोण आणि कमल हसन यांच्या मुख्य भूमिका आहेत. दीपिका पद्मा ही भूमिका साकारणार आहे. तर कमल हसन काली या निगेटिव्ह भूमिका साकारणार असल्याचं म्हंटलं जातंय.

महाभारत ते कलियुगाचा अंत यावर हा सिनेमा बेतलं असून पुराणांमध्ये लिहिलेल्या कल्की अवतारावर हा सिनेमा बेतलं असल्याचं म्हंटलं जातंय. ही एक सायन्स फिक्शन फिल्म आहे. २७ जून २०२४ ला हा सिनेमा सगळीकडे रिलीज होणार असून हा सिनेमा हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : त्यानं आयुष्य उद्धवस्त केलं, आता आम्हाला जगायचं नाही... पती-पत्नीने सेल्फी घेत संपविले जीवन; ३ वर्षांचा चिमुकला पोरका

Solapur News:'साेलापूर शहरात दररोज हव्यात ७० प्लेटलेटस् पिशव्या'; पण एकही मिळेना; रुग्णांना उपचाराअभावी राहण्याची वेळ

Latest Marathi News Live Update : धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे बच्चू कडू यांच्या आंदोलनात सहभागी होणार

आलं, हवा केली अन् ट्रेंडमधून आउट! Arattai App ची रॅंकिंग धाडकण कोसळली; टॉप-1 वरून डायरेक्ट 7 नंबरवर, WhatsApp ने मारली बाजी

सरकारचा डाव प्रतिडावाने मोडून टाका, मी मुंबईला जात नसतो, त्यांचे पाय मोडले का? जरांगेंचा सवाल

SCROLL FOR NEXT