R Madhavan Fitness Journey Esakal
Premier

R Madhavan Fitness : तरुणींचा क्रश मॅडी २१ दिवसांत झाला फॅट टू फिट, कोणताही व्यायाम न करता माधवनने केल्या 'या' गोष्टी

R. Madhavan's Fat To Fit Journey : अभिनेता आर माधवनने निव्वळ २१ दिवसात त्याचं वजन कोणत्याही प्रकारचा व्यायाम न करता कमी केलं.

सकाळ डिजिटल टीम

R. Madhavan : 'रहना है तेरे दिल में' चित्रपटातील मॅडी आजही तरुणींचा क्रश आहे. आजही हा चित्रपट प्रेक्षक आवडीने पाहतात. एक रोमँटिक हिरो म्हणून मॅडी म्हणजेच आर माधवनने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आर माधवनची क्रेझ आजही कायम आहे. 'शैतान' या चित्रपटातून माधवनने नकारात्मक भूमिका साकारून देखील प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र सध्या माधवन एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

आर माधवन सध्या त्याच्या फिटनेससाठी चर्चेत आहे. माधवनच्या वजनाविषयी सध्या चर्चा होत आहे. मॅडीने कोणतीच सर्जरी, औषधं न घेता आणि व्यायाम न करता वजन कमी केल्याचं बोललं जातय. माधवनने तब्बल २१ दिवसांत स्वत:ला फिट केलं आहे. याविषयी माधवनने स्वत:सोशल मिडीयावर माहिती दिली आहे. माधवनने पूर्वी ट्विटर आणि आता एक्स वरील त्याच्या सोशल मिडिया अकाउंटवरुन वजन कसं कमी केलय याचं सिक्रेट सांगितलय. या पोस्टमध्ये माधवन लिहीतो की, "इंटरमिटेंट फास्टिंग, जेवण ४५ ते ६० वेळा जोरात चावणे, दिवसातील शेवटचा आहार सात वाजण्याच्या आधी घेणे, सकाळी फिरणे आणि रात्री उत्तम झोप घेणे, झोपण्याच्या ९० मिनीटांपूर्वी स्क्रिन टाईम पासून दूर राहणे, जास्तीत जास्त द्रव पदार्थांचे सेवन, जास्तीत जास्त हिरव्या भाज्या, आपल्या शरीरासाठी निरोगी आणि चांगले पचन होणारे अन्न, बाकी काही केलेलं नाही."

माधवनची ही टीप अनेकांसाठी उपयोगी ठरणार आहे. नुकत्याच एका प्रसिद्ध युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत माधवनने या गोष्टी शेयर केल्या. फिटनेसच्या खास टीप्स शेयर करत त्याने हा व्हिडीओ देखील पोस्ट केलाय. यात तो म्हणतो की त्याने कोणताही व्यायाम, रनिंग, औषधे किंवा सर्जनी न करता २१ दिवसांत फॅट टू फिटचा प्रवास यशस्वी केलाय. शरीराच्या गरजेपुरता आहार घेऊन त्याने वजन घटवलय. माधवनने केलेल्या या फिट लुकचे सगळीकडून कौतुक होतय. शिवाय मॅडीचा हा फिट लुक पसंत केला जातोय. वयाच्या ५४ वर्षी माधवनचा हा फिट लुक अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतोय.

'शैतान' चित्रपटानंतर माधवनच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. 'शैतान' चित्रपटात माधवन हा अजय देवगण आणि ज्योतिकासोबत झळकला होता. आगामी काळात 'टेस्ट' या चित्रपटात माधवन झळकणार आहे. या तामिळ चित्रपटात माधवन हा सिद्धार्थ आणि नयनतारा यांच्यासोबत झळकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : उद्या ठाकरेंचा विजयी मेळावा- वरळी डोममध्ये तयारी सुरु

ST Pass : एकाच महिन्यात 5 लाख विद्यार्थ्यांना शाळेत मिळाले एसटी पास; कोणाला मिळतो सवलतीचा पास? वाचा...

Indian Women Cricket Team: भारतीय महिला संघ आज रचणार इतिहास; T20 मालिका जिंकण्याची संधी

"निलेश तू कसा आहेस माहितीये..." साबळेंच्या व्हायरल व्हिडिओनंतर मराठी अभिनेता झाला व्यक्त ; म्हणाला..

SCROLL FOR NEXT