Raveena Tandon  Esakal
Premier

Raveena Tandon : कधी सवतीवर फेकलाय ज्यूस तर कधी मुलाला हाकललं सेटवरून ; या आधीही रवीनाने रागाच्या भरात केलाय तमाशा

अभिनेत्री रवीना टंडनने एका वृद्ध महिलेला मारहाण केल्याचं प्रकरण ताजं असतानाच भूतकाळात तिने केलेल्या घटनांची चर्चा पुन्हा रंगलीये.

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री रविना टंडनने दारूच्या नशेत एका वृद्ध महिलेला मारहाण केल्याचं प्रकरण सध्या गाजत आहे. यावेळी रविना दारूच्या नशेत होती असं म्हंटलं जातंय. सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

रागाच्या भरात गोंधळ घालण्याची रवीनाची ही काही पहिलीच वेळ नाहीये. या आधीही रवीनाचे अनेक कारनामे सर्वश्रुत आहेत.

जेव्हा सेटवरून लहान मुलाला हाकललं

हि गोष्ट आहे 'मोहरा' सिनेमाच्या सेटवरची. या सिनेमातील 'टिप टिप बरसा पानी' हे गाणं खूप गाजलं होतं. या गाण्याच्या शूटिंग दरम्यान एक लहान मुलगा सेटवर उपस्थित होता. या गाण्याचं शूटिंग सुरु असताना एक लहान मुलगा सतत तिच्याकडे बघत होता. त्याच्या अशा बघण्यामुळे रवीनाला थोडंसं अस्वस्थ वाटत होतं. त्या मुलाने तिच्याकडे बघणं सोडलं नाही तेव्हा चिडलेल्या रवीनाने सेटवरील व्यक्तींना सांगून त्या लहान मुलाला सेटवरून हाकललं.

हा लहान मुलगा पुढे जाऊन बॉलिवूडमधील स्टार बनला. हा आहे अभिनेता 'रणवीर सिंग'.

सवतीवर फेकला होता ज्यूस

रवीनाने अनिल थडानीशी लग्न केलं. रवीनाच्या आधी अनिल यांचं लग्न नताशा सिप्पी यांच्याशी लग्न केलं होतं. पण त्यानंतर त्यांनी तिला घटस्फोट दिला आणि रवीनाशी लग्न केलं. त्यानंतर रवीना पुन्हा एकदा नताशाला एका पार्टीत भेटली. तिथे त्या दोघींमध्ये भांडण झालं आणि रवीनाला वाटायचं कि नताशा पुन्हा अनिलशी संबंध वाढवण्याचा प्रयत्न करतेय म्हणूनच, तिने नताशाच्या अंगावर ज्युस फेकला. याचा खुलासा नताशाने एका मुलाखतीमध्ये केला.

१ जूनच्या रात्री काय घडलं?

मुंबईतील वांद्रे परिसरात काही लोकांना मारहाण केल्याचा आरोप रवीनावर करण्यात आला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये बोलणाऱ्या व्यक्तीने असं सांगितलं कि, रवीना आणि रवीनाच्या ड्रायव्हरने एक वृद्ध महिला आणि दोन तरुण मुलींना मारहाण केल्याचं सांगितलं. या तिघींपैकी एक त्याची आई, एक बहीण आणि एक भाची असल्याचं त्याने म्हंटलं. तर त्याच्यासोबत असलेल्या तरुणीने रवीनाला पोलिसात जाण्याची धमकी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diwali Bonus Dispute : बोनस कमी मिळाल्याने संतप्त टोल कर्मचाऱ्यांनी घेतला बदला; हजारो वाहने शुल्काशिवाय सोडली, कंपनीला लाखोंचे नुकसान

Sankeshwari Chilli : नांदेडमध्ये फुलली गडहिंग्लजची ‘संकेश्वरी’ मिरची, पाऊस अधिक असूनही उत्पादन वाढलं

Latest Marathi News Live Update : सोलापुरात भाजपा कार्यकर्त्यांचे थेट पक्षालाच आव्हानहोरपळून मृत्यु

Smriti Mandhana : घसरगुंडीची सुरुवात माझ्यापासून; स्मृतीने इंग्लंडविरद्धच्या पराभवाची स्वीकारली जबाबदारी

असरानीवर घाईघाईत का करण्यात आले अंत्यसंस्कार? 'ही' होती त्यांची शेवटची इच्छा, मॅनेजरने केला खुलासा

SCROLL FOR NEXT