Shreyas Talpade in Kartik Aaryan Esakal
Premier

Chandu Champion : चंदू चॅम्पियन सिनेमात श्रेयस तळपदेची वर्णी ; साकारतोय 'ही' भूमिका

Shreyas Talpade in Chandu Champion : अभिनेता श्रेयस तळपदे 'चंदू चॅम्पियन' सिनेमात एका विशेष भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Shreyas Talpade : मराठीबरोबरच बॉलिवूडमध्येही स्वतःची ओळख निर्माण करणारा अभिनेता श्रेयस तळपदे सध्या गाजत असलेल्या चंदू चॅम्पियन या सिनेमातून एका विशेष भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत श्रेयसने त्याने या सिनेमात काम केल्याचं रिव्हील केलं. श्रेयस या सिनेमात सचिन कांबळे या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे.

श्रेयसची पोस्ट

सोशल मीडियावर श्रेयसने पोस्टच्या माध्यमातून त्याने सिनेमात काम केल्याचं रिव्हील केलं आणि प्रेक्षकांना हा सिनेमा पाहण्याची विनंती केली. सोबतच त्याने सिनेमातील त्याचा लूक रीलच्या माध्यमातून शेअर केला. तो पोस्टमध्ये म्हणाला,"नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटात मला इन्स्पेक्टर सचिन कांबळेची लहानशी भूमिका साकारण्याची संधी मिळाली. ज्यावेळी कबीर भाईंनी ( दिग्दर्शक कबीर खान ) मला या चित्रपटाची गोष्ट सांगितली, तेव्हा सुरुवातीला मला खरंच आश्चर्य वाटलं होतं आणि आपल्या महाराष्ट्रातील बरेच लोक या खऱ्या आयुष्यातील चॅम्पियनला ओळखत नाहीत याचं वाईटसुद्धा वाटलं. मला सचिन कांबळे ही भूमिका दिल्याबद्दल कबीर भाईंचे खूप खूप आभार.

माझा या भूमिकेसाठी विचार केल्याबद्दल छाब्रा यांचे देखील मनापासून आभार. कधी कधी मलाच आश्चर्य वाटतं की, तू माझा या भूमिकेसाठी कसा विचार केलास पण, तू योग्य निर्णय घेतलास…त्यासाठी तुझे आभार आय लव्ह यू डार्लिंग. आता शेवटी कार्तिक आर्यनबद्दल सांगायचं झालं, तर तू खरा चॅम्पियन आहेस. तू खूप खरेपणाने ‘चंदू’ची ही भूमिका साकारली आहेस. बायोपिकमध्ये काम करणं हे कधीच सोपं नसतं. त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. तू संपूर्णपणे झोकून देऊन काम केलंस…हा ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपट आणि तुझे भविष्यातील सगळे सिनेमे ब्लॉकबस्टर ठरोत हीच शुभेच्छा! ‘चंदू चॅम्पियन’ तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. नक्की पाहा…ही सुंदर कलाकृती पाहणं चुकवू नका"

'हे' मराठी कलाकारही सिनेमात

श्रेयस व्यतिरिक्त या सिनेमात हेमांगी कवी, गणेश यादव, सोनाली कुलकर्णी आणि आरोह वेलणकर या मराठी कलाकारांनीही काम केलं आहे. सोनाली आणि आरोहने या सिनेमात कोणती भूमिका साकारली आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा सिनेमा पाहावा लागेल.

समीक्षकांनी केलं कौतुक

पॅरालिम्पिक विजेते मुरलीकांत पेटकर यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा असून त्यांचा संपूर्ण प्रवास या सिनेमात पाहायला मिळणार आहे. कार्तिक आर्यनने साकारलेल्या मुरलीकांत यांच्या भूमिकेसाठी त्याचं खूप कौतुक होत आहे.१४ जून २०२४ ला हा सिनेमा थिएटर्समध्ये रिलीज झाला असून समीक्षकांनी या सिनेमाचं कौतुक केलं आहे. सिनेमाने पहिल्या दिवशी जरी कमाई केली असली तरी सध्या सगळीकडे होत असलेल्या कौतुकामुळे हा सिनेमा सुपरहिट होईल अशी चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT