Adah Sharma 
Premier

Adah Sharma: अदाने नेसली चक्क 'इतक्या' रुपयांची साडी, कारण ऐकून व्हाल थक्क!

द केरला स्टोरी या सिनेमामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अदा शर्मा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे सुद्धा चर्चेत असते.

सकाळ वृत्तसेवा

Adah Sharma: द केरला स्टोरी या सिनेमामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अदा शर्मा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे सुद्धा चर्चेत असते. तिचे डान्स रिल्स असो किंवा मराठी भाषेतील गाणी सोशल मीडियावरील तिच्या ऍक्टिव्हिटीज सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. पण आज अदा चर्चेत आलीये एका हटके कारणामुळे. ( actress adah sharma wore a saree worth 15 rupees)

आज अदाने एका कार्यक्रमाला सुंदर साडीत हजेरी लावली. ऑरेंज आणि व्हाईट अशी कलरफुल प्रिंट असलेली ही तिची साडी तिच्यावर शोभून दिसत होती. पापाराझींनी तिच्या लूकचं कौतुक केलं. अदाने त्यांचे आभार मानलेच पण तिने साडीची किंमत सांगताच सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अदाने चक्क १५ रुपयांची साडी नेसली होती. तिचं उत्तर ऐकून पापाराझींना खूप मोठा धक्का बसला. झूम टीव्ही चॅनेलने त्यांच्या इन्स्टा हँडलवर अदाचा शेअर केलेला व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.

विशेष म्हणजे अदाने नेसलेली साडी तिच्या आईच्या आईची म्हणजे तिच्या आजीची आहे. ही साडी खूप जुनी असून तिच्या आजीने त्या काळी १५ रुपयांमध्ये खरेदी केली होती आणि आज अदाने आजीची आठवण म्हणून ही साडी नेसली. अदाच्या या साडीचं आणि तिच्या संस्कारांचं अनेकांनी कौतुक केलं. अदा या साडीच्या रूपात तिच्या आजीच्या आठवणी जपतेय असंच म्हणावं लागेल.

द केरला स्टोरीमुळे मिळाली ओळख

अदाने २००८ साली १९२० या हॉरर सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमात तिने साकारलेली भूमिका सगळ्यांना आवडली. तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. या सिनेमासाठी तिला फिल्मफेअरचं नामांकनसुद्धा मिळालं. त्यानंतरही तिने बऱ्याच सिनेमात काम केलं पण २०२३ साली आलेल्या द केरला स्टोरी या सिनेमाने तिच्या करिअरची दिशा बदलली. अदाला या सिनेमामुळे रातोरात प्रसिद्धी मिळाली. तिच्या या सिनेमाचं कौतुकही झालं आणि अनेकांनी या सिनेमावर टीका सुद्धा केली. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळालं.

नुकताच तिचा बस्तर द नक्सल स्टोरी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला. पण हा सिनेमा फ्लॉप ठरला. आता लवकरच ती द गेम ऑफ गिरगिट या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

अदाचं मराठी प्रेम

सिनेमांसोबतच अदा सगळ्यांच्या लक्षात राहते ते तिच्या मराठी भाषेवरील प्रेमामुळे. सोशल मीडियावर बऱ्याचदा ती शाळेत असताना शिकलेली मराठी गाणी शेअर करत असते. अनेकजण तिचे हे व्हिडीओ शेअर करतात आणि तिचं कौतुक सुद्धा करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT