Aishwarya Narkar  Esakal
Premier

Aishwarya Narkar : "गाडीच्या बोनेटमध्ये..." ; ऐश्वर्या यांना आला धक्कादायक अनुभव, सगळ्यांना दिला सतर्कतेचा इशारा

Aishwarya Narkar Post On Social Media : अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नागरिकांना एका महत्त्वाच्या गोष्टीसंदर्भात नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Aishwarya Narkar Post : अभिनेत्री ऐश्वर्या नारकर त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत असतात. त्यांचे योग सेशन्स, डान्स रील्स, फोटोशूट्स कायमच सोशल मीडियावर गाजतात पण नुकतीच त्यांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ऐश्वर्या यांच्या कारच्या बोनेटमध्ये त्यांना सापडलेल्या वस्तूमुळे त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

ऐश्वर्या यांची पोस्ट

सोशल मीडियावर ऐश्वर्या यांनी एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्या म्हणाल्या,"हाय, काल जरा एक गोंधळ झाला म्हणून आवर्जून हा व्हिडीओ करतेय. काल माझी गाडी सर्व्हिसिंगसाठी गेली होती. एक-दोन तासांनी तिकडून मला फोन आला कि, तुमच्या आजूबाजूला काही मांजरं आहेत का ? तर म्हंटलं, हो खूप आहेत. का ? काय झालं ? तर ते म्हणाले, तुमच्या गाडीत तीन मांजराची छोटी बाळं सापडली आहेत. माझ्या पोटात अक्षरशः गोळा आला कारण, आदल्याच रात्री एका मांजरीने आमच्या बिल्डिंगमध्ये तीन पिल्लांना जन्म दिला होता. त्यांना आम्ही बॉक्समध्ये ठेवलं होतं कारण पावसापाण्याचे दिवस आहेत ती सेफ राहावी म्हणून. पण कधी ती माझ्या गाडीत बाळांना घेऊन गेली, तिने कधी बाळांना माझ्या गाडीत ठेवलं हे कळलं सुद्धा नाही. गाडी चौदा-पंधरा किलोमीटर चालली तरीही बाळं अगदी सुरक्षित होती ही अक्षरशः देवाची कृपा आहे. त्या सर्व्हिस स्टेशनच्या माणसांनी त्या बाळांना आणून सोडलं, त्यांच्या आईला भेटवलं आणि आता ते सगळे सेफ आहेत. पण मला तुम्हाला हेच सांगायचं आहे कि, पावसापाण्याचे दिवस आहेत तर गाडी काढण्यापूर्वी गाडीचं बॉनेट उघडून त्यात टॉर्च मारून पिल्लं आहेत का बघा. गाडीच्या खाल्ली सुद्धा बघा कारण आपल्याला कळतही नाही आणि या बाळाचा उगाच जीव जाऊ शकतो. सो प्लिज एवढी काळजी घ्या थँक यु. "

सोशल मीडियावर ऐश्वर्या यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी कमेंट करत सर्व्हिस स्टेशनमधील माणसांच्या तत्परतेच कौतुक केलं आहे. तर ऐश्वर्या यांनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दलही त्यांनी त्यांची मतं व्यक्त केली. ऐश्वर्या यांच्या मताशी अनेकांनी सहमती दर्शवली आणि त्यांच्याबरोबर घडलेले प्रसंग शेअर केले.

ऐश्वर्या सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत काम करत असून त्यांची ही मालिका खूप गाजतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karmabhoomi Express Accident : हृदयद्रावक ! कर्मभूमी एक्सप्रेसमधून तीन युवक खाली पडले; दोघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

Panchang 19 October 2025: आजच्या दिवशी सूर्य कवच स्तोत्र पठण व ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करावा

माेठी बातमी! 'साेलापुरातील धानप्‍पाला बंगळूर पोलिसांनी उचलले'; कर्नाटक मंत्र्यांच्या मुलाला नेमकं काय म्हणाला?

Chandrakant Patil Sangli : सांगलीत भाजपकडून मित्रपक्षांना थेट दुय्यम दर्जा, 'जागा उरल्या तर मित्रपक्षांचा विचार'; चंद्रकांत दादांनी थेटच सांगितलं...

आनंदाची बातमी! सोलापूर जिल्ह्यातील महापूर, अतिवृष्टीने बाधितांसाठी ७७२ कोटी, आजपासून पैसे खात्यात जमा होणार..

SCROLL FOR NEXT