Amruta learning new dancing skills  
Premier

Amruta Khanvilkar : अमृता घेतेय आता 'या' शास्त्रीय नृत्यप्रकाराचं शिक्षण

Amruta Khanvilkar learning new dance skill : उत्तम अभिनेत्री आणि नृत्यांगना असलेल्या अभिनेत्री अमृता खानविलकरने शास्त्रीय नृत्यप्रकार शिकायला सुरुवात केली आहे. जाणून घेऊया तिच्या या नवीन कामगिरीविषयी.

सकाळ डिजिटल टीम

उत्तम अभिनयासोबतच तितक्याच उत्तम नृत्यासाठी अभिनेत्री अमृता खानविलकर ओळखली जाते. तिची अदाकारी, तिचे हावभाव याचे अनेकजण फॅन आहेत. आजवर अनेक अफलातून भूमिका साकारून त्या अजरामर केल्या आहेत. 'वाजले कि बारा','चंद्रा', 'बाई गं' ही तिची काही गाजलेली गाणी म्हणता येतील. तिचं नृत्यावरचं प्रेम तिचे चाहते चांगलंच जाणून आहेत.

अमृता तिच्या आगामी मराठी सिनेमांसोबतच बॉलिवूड प्रोजेक्टच्या तयारीमध्येही व्यस्त आहे. यासोबतच अमृता तिचं लहानपणीच स्वप्न पूर्ण करतेय. अमृता शास्त्रीय नृत्य शिकतेय. अमृता कथ्थक हा शास्त्रीय नृत्यप्रकार शिकत असून ती या नवीन कामगिरीसाठी खूप खुश आहे.

अमृताचं नृत्यप्रेम हा तिच्या जिव्हाळ्याच्या विषय आहे आणि म्हणून तिने कथ्थक शिकण्याचा निर्णय घेतला आहे. अमृता नुकतीच " हिरामंडी " साठी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत दिसली होती. आता हे दोघं भविष्यात बरोबर काम करणार का ? हा प्रश्न देखील तिच्या चाहत्यांना पडला आहे.

या बद्दल बोलताना अमृता म्हणते " लहानपणी सगळ्यांची स्वप्न असतात आपण मोठं होऊन हे करावं ही आवड जोपासावी तसचं माझं एक लहानपणीच स्वप्न होत आपण कथ्थक शिकावं. नृत्य म्हणजे माझ्यासाठी जीव की प्राण असा विषय होता पण लहानपणी तेवढी परिस्थिती नसल्यामुळे मला कथ्थकच प्रशिक्षण घेता आल नाही म्हणून ही इच्छा मी आता पूर्ण करतेय आणि त्याचा खूप जास्त आनंद आहे. मंजिरी देव यांची नातसून प्रिया यांच्याकडून मी कथ्थकच प्रशिक्षण घेतेय."

याआधीही अमृताने तिच्या इंस्टाग्राम आणि युट्युब चॅनेलवर अमृतकला या नावाने उपक्रम सुरु केला होता. या उपक्रमात ती विविध गाण्यांवर नृत्य सादर करायची. तिचे हे डान्स रील चांगलेच व्हायरल झाले होते.

येत्या काळात अमृता अनेक वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स मधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. . 'कलावती','ललिता बाबर','पठ्ठे बापूराव' हे मराठी सिनेमे तिच्या प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यासोबतच ती काही बॉलिवूड प्रोजेक्टस् मध्येही काम करणार असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सियाचं ४ महिन्यांपूर्वीच झालेलं लग्न, चेतनसोबतच्या व्हॉटसअप चॅटमधून धक्कादायक खुलासा; केतनच्या खूनाबाबत काय बोलले?

FDA Action: तुकाराम मुंढेंकडून मोठं रॅकेट उद्ध्वस्त! दुधात शॅम्पू, डिटर्जंट, युरिया, पामतेलाचा वापर; १३ जणांना अटक

Latest Marathi News Update: ताम्हिणीऐवजी पर्याय मार्गाचा वापर करा, पौड पोलिसांची नाकाबंदी

Leopard in Sangli : ईश्‍वरपुरात लोकवस्तीत घुसला बिबट्या; पाच तासांच्या थरारानंतर भुलीचं इंजेक्शन देऊन केलं जेरबंद, संभुआप्पा मठ परिसरात नेमकं काय घडलं?

Monsoon UTI Risk in Women: पावसाळ्यात महिलांना युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनचा वाढतो धोका; 'ही' एक सवय पडू शकते महागात

SCROLL FOR NEXT