Chhaya Kadam at Cannes 2024 Esakal
Premier

Cannes Film Festival 2024 : अभिमानास्पद! कान चित्रपट महोत्सवात मराठमोळ्या छाया कदम यांना मिळालं स्टँडिंग ओव्हेशन

अभिनेत्री छाया कदम यांना कान फिल्म महोत्सवमध्य स्टँडिंग ओव्हेशन मिळालं. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ गाजतोय.

सकाळ डिजिटल टीम

मराठीसोबत बॉलिवूडही गाजवणाऱ्या अभिनेत्री छाया कदम यांनी नुकतीच कान फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली. पहिल्या दिवशी आईची साडी नेसून रेड कार्पेटवर हजेरी लावणाऱ्या छाया यांची चांगलीच चर्चा होती. कानमध्ये छाया यांचा सन्मान झाला आणि सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

छाया यांच्या 'All we imagine as light' (ऑल वि इमॅजिन अॅज लाईट) या सिनेमाचं स्क्रीनिंग कान फिल्म फेस्टिव्हलला पार पडलं. त्यांच्या या सिनेमाला आणि छाया यांच्या अभिनयाला उपस्थित प्रेक्षक आणि सेलिब्रिटींकडून स्टँडिंग ओव्हेशन मिळालं. या सन्मानाने छाया भारावून गेल्या. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी कमेंट करत छाया यांचं कौतुक केलं. सुकन्या मोने, अक्षया नाईक यांनी कमेंट करत छाया यांचा अभिमान वाटत असल्याचं म्हंटलं तर "कितीतरी अभिमानाची गोष्ट....अभिनंदन छाया कदम " अशी कमेंट अनेक युजर्सनी केली आहे.

यासोबतच त्यांचा कान मधील लुक सोशल मीडियावर गाजला. प्रिंटेड लॉन्ग स्कर्ट्स, व्हाईट शर्ट, ब्लेझर आणि नाकात पारंपारिक मराठी नथ या त्यांच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. वेस्टर्न ड्रेसवर त्यांनी नथ घालत त्यांनी जपलेल्या परंपरेचं अनेकांनी कमेंट्समध्ये कौतुक केलं.

कानमधील रेड कार्पेट एन्ट्रीची पोस्ट झाली व्हायरल

छाया यांनी आईची सोनेरी काठापदराची साडी आणि पारंपरिक नथ घालत रेड कार्पेटवर हजेरी लावत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी म्हंटलं,"आई तुला विमानातून फिरवण्याचे माझे स्वप्न अधुरे राहिले.
...पण आज तुझी साडी आणि नथ मी विमानातून कान्स फिल्म फेस्टीव्हल पर्यंत घेऊन आले, याचे समाधान आहे. तरी आई ! आज तू हवी होतीस. हे सगळं पाहण्यासाठी. Love you मम्मुडी आणि खूप खूप मिस यू"

छाया यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांच्या लूकचं कौतुक केलं. परदेशात असूनही त्यांनी त्यांची परंपरा जपली म्हणून त्यांचा अभिमान वाटत असल्याचं अनेकांनी म्हंटलं.

छाया यांच्या 'कान'मध्ये सिनेमाची कथा

नर्स असलेल्या प्रभू आणि अनु त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप संकटाचा सामना करत असताना अचानक एका प्रवासावर निघतात आणि पुढे काय होतं याची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. या सिनेमात छाया यांनी पार्वती ही भूमिका साकारली असून अनेकांना त्यांची ही भूमिका पसंत पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आशियाई विजेत्या भारतीय तिरंदाजांची अवहेलना; १० तास विमानतळावर अडकले; अस्वच्छ धर्मशाळेत वास्तव्य...

Grain Scam:'शासकीय धान्याचा ८७ लाखांचा अपहार'; फलटण तालुक्यातील धक्कादायक प्रकार, सातारा जिल्ह्यात उडाली खळबळ..

मोठी बातमी! शैक्षणिक सहलींसाठी विद्यार्थ्यांसाठी सहलीत ५० टक्के सवलत; प्रत्येकास १० लाखांचा अपघात विमाही; एसटी महामंडळाचे आगारप्रमुख जाणार शाळांमध्ये

आजचे राशिभविष्य - 19 नोव्हेंबर 2025

Horoscope Prediction : आज तयार होतोय अमला राजयोग; मेष आणि या पाच राशींच्या आर्थिक अडचणींना लागणार पूर्णविराम !

SCROLL FOR NEXT