Hruta Durgule Web series  Esakal
Premier

Hruta Durgule Video : आता माझी सटकली! गुंडांशी दोन हात आणि पोलीस अधिकाऱ्याचा रुबाब; हृताचे अ‍ॅक्शन सीन व्हायरल, पाहा व्हिडीओ

Hruta Durgule's Web Series BTS video : अभिनेत्री ऋता दुर्गुळेने तिच्या कमांडर करण सक्सेना या वेबसीरिजमधील खास बिहाइंड द सीन व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले.

सकाळ डिजिटल टीम

Hruta Durgule : अभिनेत्री ऋता दुर्गुळेने कमांडर करण सक्सेना या वेबसिरीजमधून हिंदी वेबविश्वात पदार्पण केलं. या वेबसिरीजमध्ये ऋता पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत असून पहिल्यांदाच ती एका डॅशिंग भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली. तिची ही वेगळी भूमिका आणि धडाकेबाज अंदाज चांगलाच चर्चेत आहे. ऋताने नुकताच सोशल मीडियावर तिच्या वेबसिरीजचा एक बिहाइंड द सीन व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

ऋताने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ऋता पोलीस अधिकाऱ्याच्या वेषात दिसत असून ती सुरुवातीला तयारी करताना दिसतेय. त्यानंतर ती एका गुंडाला पकडत असून त्याला मारताना दिसतेय. तिने केलेली अॅक्शन आणि त्यासाठी घेतलेली मेहनत या व्हिडिओमध्ये दिसून येतेय. कायमच रोमँटिक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या ऋताच्या या धडाकेबाज अंदाजाने सगळ्यांनाच भुरळ घातली आहे. सोशल मीडियावर तिने हा शेअर केलेला व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.

ऋता या वेबसिरीजमध्ये एका डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसतेय. एसीपी रचना म्हात्रे असं तिच्या भूमिकेचं नाव आहे. तिचा हा अंदाज अनेकांना भावला असून अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत तिचं कौतुक केलं.

गुरमीत चौधरी याची या वेबसिरीजमध्ये मुख्य भूमिका असून ही वेबसिरीज हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे. तर मराठी इंडस्ट्रीत ऋताचा कन्नी हा सिनेमा रिलीज झाला होता. त्यानंतर अजून कोणताही नवा प्रोजेक्ट ऋताचा रिलीज झाला नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT