kishori ambiye new serial Esakal
Premier

Kishori Ambiye : 'पहिल्यांदाच दिसणार वेगळ्या भूमिकेत' ; खाष्ट सासू ते प्रेमळ आई साकारणाऱ्या किशोरी 'या' लोकप्रिय मालिकेत करतायेत काम

Kishori Ambiye New role in popular serial : कधी विनोदी तर कधी निगेटिव्ह भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या किशोरी आंबिये एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

New Serial : कधी खाष्ट, कधी प्रेमळ, तर कधी विनोदी, कधी गंभीर अशा विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री किशोरी आंबिये सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत एका नव्या भूमिकेत दिसतायेत. कॉलेजच्या प्राध्यापिकेची भूमिका त्या यात साकारत आहेत. पद्मिनी गाडगीळ असं या व्यक्तिरेखेचं नाव आहे. आजवरच्या त्यांच्या भूमिकांपेक्षा अगदी वेगळी व्यक्तिरेखा यात साकारत आहेत. ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर रोज रात्री ९.००वा. प्रसारित होते. मालिका विश्वात एआयवर आधारित असलेली ‘तू भेटशी नव्याने’ ही जगभरातली पहिलीच मालिका आहे. प्रत्येकाला पुन्हा प्रेमात पाडणारी ही नवीकोरी गोष्ट दोन वेगवेगळ्या काळांमध्ये आणि वेगळ्या शैलीत दिसणार आहे. मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते अजय मयेकर आहेत. सहनिर्माते संदीप जाधव आहेत.

या मालिकेत किशोरी आंबिये' यांचे दोन ट्रॅक असून त्यांच्या नव्या व्यक्तिरेखेमुळे मालिकेत काय वळण येणार? हे बघणं उत्सुकतेचे ठरणार आहे. दोन काळातल्या व्यक्तिरेखा त्या यात साकारत असून प्राध्यापिकेच्या भूमिकेनंतर नव्या ट्रॅकमध्ये त्या कोणत्या रूपात दिसणार? आणि त्यांच्या येण्याने अभिमन्यू आणि तन्वीच्या आयुष्यात काय होणार ? की त्यांच्या येण्याने या दोघांचे बंध जुळले जाणार? हे मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळणार आहे.

"चांगल्या विषयामुळे आणि भूमिकेमुळे मी या मालिकेला होकार दिला. मैत्री आणि प्रेम या प्रवासात वळणावळणावर घडणाऱ्या अनपेक्षित गोष्टी, याचा रंजक अनुभव देणारी ही मालिका आहे." असं त्या म्हणाल्या. 'तू भेटशी नव्याने' मालिकेच्या निमित्ताने दोन वेगळ्या काळांतल्या भूमिका करताना खूप मजा येत असल्याचे किशोरी आंबिये यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं.

“नातं जपण्यासाठी सोबत हवी असते फक्त निरंतर प्रेमाची..! कारण,जगायला श्वासाची नाही तर, प्रेमाची गरज असते! ' ही या मालिकेची टॅगलाईन लोकप्रिय झाली आहे. सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत. किशोरी, सुबोध आणि शिवानी यांच्या अभिनयाची जुगलबंदी अनुभवण्यासाठी पाहायला विसरू नका तू भेटशी नव्याने दररोज रात्री ९ वाजता फक्त सोनी मराठीवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FIFA World Cup 2026 : मेस्सी विरुद्ध रोनाल्डो QF मध्ये भिडणार; वर्ल्ड कप २०२६ चे गट जाहीर, डोनाल्ड ट्रम्प यांना 'शांतता' पुरस्कार

MPSC Exams 2026: एमपीएससी 2026 वेळापत्रक जाहीर; राज्यसेवा, वनसेवा, गट-ब–क परीक्षांचे दिनांक स्पष्ट

Panchang 6 December 2025: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

क्रिकेटप्रेमींसाठी ६ डिसेंबर आहे खास...आज एक दोन नव्हे तर तब्बल ११ क्रिकेटपटूंचा वाढदिवस 'Birthday Special-11' एकदा वाचाच...

DK शिवकुमार-जारकीहोळी भेटीमागचे राजकारण गडद; सत्तावाटपावरून काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली, संक्रातीपर्यंत निर्णय होणार?

SCROLL FOR NEXT