Prajakta Mali announces her first marathi movie as producer 
Premier

Phullwanti : प्राजक्ताची फुलवंती ! अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प्राजक्ताचं सिनेनिर्मिती क्षेत्रात पदार्पण

Prajakta Mali announces her first marathi movie as producer : अभिनेत्री प्राजक्ता माळीने अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 'फुलवंती' या सिनेमाचं मोशन पोस्टर शेअर करत ती निर्माती म्हणून सिनेनिर्मिती क्षेत्रात पदार्पण करत असल्याची घोषणा केली.

सकाळ डिजिटल टीम

Prajakta Mali : आजवर मालिका, सिनेमा यांमधून आपल्या दर्जेदार अभिनयाने आणि कमाल अदाकारीने सगळ्यांचं मन जिंकणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी आता सिनेनिर्मिती क्षेत्रात पदार्पण करतेय. आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तिने तिच्या सिनेमाचा पहिलं मोशन पोस्टर तिने सोशल मीडियावर रिलीज करत तिच्या या सिनेमाची घोषणा केली.

'फुलवंती' असं प्राजक्ताच्या या आगामी सिनेमाचं नाव असून प्रवीण तरडे यांच्या पत्नी स्नेहल प्रवीण तरडे या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. स्नेहल यांचं या सिनेमातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण होतंय.

सिनेमाच्या मोशन पोस्टरवर रंगमंचावर असलेली ढोलकी दिसत असून तिच्यावर घुंगरू आणि फुलं पडत असल्याचं दिसतंय. सिनेमाच्या या लक्षवेधी मोशन पोस्टरने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या सिनेमातून अभिनेत्री स्नेहल तरडे दिग्दर्शिका म्हणून पदार्पण करतेय तर प्रवीण तरडे यांनी या सिनेमाचं संवाद लेखन केलं आहे. "रंगणार… पखवाज आणि घुंगरांची जुगलबंदी... आपल्या अदांनी घायाळ करायला येतेय ‘फुलवंती’ " असं कॅप्शन या पोस्टरला देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडमध्ये 'ओमकारा', 'दृश्यम', 'रेड' यांसारख्या सिनेमाची निर्मिती करणाऱ्या पॅनारोमा स्टुडिओजनेही प्राजक्ताच्या शिवोहम या निर्मिती संस्थेसोबत या सिनेमाची निर्मिती केली आहे. तर कुमार पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार अँड कंपनी हे सुद्धा या सिनेमाचे निर्माते आहेत.

प्राजक्ताने या सिनेमाचं मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर करताच तिच्या चाहत्यांनी आणि सेलिब्रिटी मित्रांनी कमेंट्स करत तिचं अभिनंदन केलं. 2021 मध्ये प्राजक्ताने या सिनेमाची निर्मिती करत असल्याची घोषणा सोशल मीडियावर केली होती.

पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या गाजलेल्या फुलवंती या ऐतिहासिक कादंबरीवर आधारित हा सिनेमा असून पेशवेकालीन महाराष्ट्रातील लावणीची कला आणि एक सुंदर प्रेमकथा या सिनेमातून उलगडणार आहे. या सिनेमात 'फुलवंती' ची भूमिका कोण साकारणार हे मात्र अजून रिव्हील करण्यात आलं नाहीये.

महेश लिमये यांनी या सिनेमाची सिनेमॅटोग्राफी केली असून अनेक दिग्गज कलाकार या सिनेमात असणार असल्याचं म्हंटलं जातंय.

या आधी प्राजक्ताने तिच्या शिवोहम या निर्मिती संस्थेअंतर्गत एका गाण्याची निर्मिती केली होती. मरुगेलरा आणि फेडेड या गाण्याचं मॅश अप तिने भरतनाट्यम या नृत्यप्रकारातून सादर केलं होतं. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS इतका भ्रष्टाचारी, ७.५ कोटी एका दिवसात नाही आले; व्यवस्था झोपलेली का? राज्यपालांचा संतप्त सवाल

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२६ मधील परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

Kolhapur Roads : कोल्हापुरातील रस्ते बादचं! सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका; ७७ रस्त्यांच्या सर्व्हेद्वारे २३९ पानी मुद्दे

Panchang 18 October 2025: आजच्या दिवशी मारुती स्तोत्र व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

“चित्रपटाचा बजेट–कमाई जाणून घ्यायचं प्रेक्षकांचं काम नाही” – दिग्दर्शक अनुभव सिन्हा

SCROLL FOR NEXT