Priyanka At Airport Esakal
Premier

Priyanka Chopra Jonas : अनंत-राधिकाच्या लग्नानंतर प्रियांका तात्काळ एअरपोर्टवर रवाना, पापराझींसाठी केलेल्या कृतीने वेधलं लक्ष

Priyanka Chopra spotted at Airport : अभिनेत्री प्रियांका चोप्रा अनंत-राधिकाच्या लग्नाला हजेरी लावल्यानंतर तात्काळ यूएसला रवाना झाली.

सकाळ डिजिटल टीम

Priyanka Chopra Jonas : अनंत अंबानी- राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा चर्चेत आहे. या सोहळ्याला अनेक स्टार सेलिब्रिटीजनी हजेरी लावली होती. बॉलिवूड, हॉलिवूड आणि अनेक दाक्षिणात्य सिनेविश्वातील कलाकारांनी या लग्नसोहळ्याला हजेरी लावत या नवविवाहित दांपत्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. या लग्नसोहळ्यासाठी बॉलिवूडबरोबर हॉलीवूडमध्येही स्वतःचा दबदबा निर्माण करणाऱ्या अभिनेत्री प्रियांका चोप्रा-जोनास नवरा निकबरोबर खास युएसवरून हजर झाली.

वरातीमध्ये प्रियांकाचा भन्नाट डान्स

अनंतच्या वरातीमध्ये प्रियांकाने केलेला डान्स आणि रेड कार्पेटवर दिसलेलं निक आणि प्रियांकाचं बॉण्डिंग यामुळे या जोडीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. लग्नातही या जोडीने खूप धमाल केली. सोशल मीडियावर या जोडीचे फोटो व्हायरल झाले होते. पण लग्न झाल्यानंतर लगेचच प्रियांका एअरपोर्टवर रवाना झाली.

पापाराझींची काळजी

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये प्रियांकाला प्रायव्हेट एअरपोर्टवर पापाराझींनी स्पॉट केलं. प्रियांका एकटीच जॉगिंग सूटमध्ये एअरपोर्टवर रवाना झाली. तिच्याबरोबर निक दिसला नाही. प्रियांकाने सगळ्या पापाराझींना नमस्कार केला आणि त्यांना "आता तुम्ही झोपायला जा" असं कृतीने सांगितलं. तिच्या या कृतीच सध्या कौतुक होतंय.

आगामी प्रोजेक्ट्स

सध्या प्रियांका अनेक सिनेमांच्या शूटिंगमध्ये बिझी असल्याने ती लगेच लग्न आटपल्यानंतर ती युएससाठी रवाना झाल्याचं म्हंटलं जातंय. तिचा लवकरच हेड्स ऑफ स्टेट्स आणि द ब्लफ हे दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

या शाही लग्नसोहळ्याला देश-विदेशातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. तर अनेक गायकांनी लाईव्ह परफॉर्मन्स सादर केले. अनंत-राधिकाचा लग्नातील लूकही सोशल मीडियावर चर्चेत आहे. या आलिशान सोहळ्याचे अनेक फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Cabinet : नितीश कुमार मंत्रिमंडळात असणार दोन उपमुख्यमंत्री अन् २० मंत्र्यांचा समावेश!

Pune Politics : राज ठाकरेंनी अपमान केलेल्या अभिनेत्याचा भाजप प्रवेश

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

SCROLL FOR NEXT