Actress Rashmi Anpat in new Serial's promo released on social media 
Premier

Antarpaat Colors Marathi Serial : अभिनेत्री रश्मी अनपट दिसणार 'अंतरपाट' मालिकेत; प्रोमोची होतेय चर्चा

Actress Rashmi Anpat in new Serial : अभिनेत्री रश्मी अनपट 'अंतरपाट' या कलर्स मराठीवरील नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. मालिकेच्या नवीन प्रोमोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Colors Marathi Serial Update : कलर्स मराठीवर सध्या अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. इंद्रायणी, सुख कळले यांसारख्या नुकत्याच सुरु झालेल्या मालिकांची चर्चा पहिल्या एपिसोड पासूनच प्रेक्षकांमध्ये रंगली आहे आणि आता आणखी एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतंच कलर्स मराठीने नव्या मालिकेचा प्रोमो सोशल मिडियावर शेअर केला.

अंतरपाट असं या नवीन मालिकेचं नाव असून मालिकेचा प्रोमो सगळ्यांनाच पसंत पडतोय. मालिकेत गौतमीची गोष्ट पाहायला मिळणार असून प्रोमोमध्ये घरात हळदी समारंभ थाटात पार पडताना दिसतोय. आनंदी वातावरण, लग्नाची लगबग, सजलेले घर, पाहुण्यांचा वावर दिसत आहे. लव्ह मॅरेजच्या काळात अरेन्ज मॅरेज करणाऱ्या गौतमीला परफेक्ट जोडीदार मिळाल्याने ती अतिशय आनंदी आहे.

गौतमीला आपल्या जोडीदारासोबत प्रत्येक स्वप्नं पूर्ण करायचे आहे. तर अभिनेत्री रेशम टिपणीसही या प्रोमोमध्ये दिसत असून ती मुलाकडून उष्टी हळद घेऊन येताना दिसतेय. तर गौतमीचा होणारा नवरा क्षितिज एकटाच त्याच्या खोलीत रडताना या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलंय.

पहा प्रोमो:

क्षितिज या लग्नाने खुश आहे का? काय लिहिले आहे गौतमीच्या नशिबात? काय असेल क्षितिजचं रहस्य याची गोष्ट या मालिकेत पाहायला मिळणार आहे. अनेकांनी कमेंट करत मालिकेचा प्रोमो आवडल्याचं कमेंट्स मध्ये सांगितलं आहे.

'अंतरपाट' या मालिकेत अशोक ढगे, रश्मी अनपट, रेशम टिपणीस यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही गोष्ट नेमकी काय असणार याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांमध्ये आहे. या मालिकेमुळे कोणती मालिका बंद होणार का किंवा मालिकेची वेळ बदलणार का? असा प्रश्नही अनेक प्रेक्षकांना पडला आहे. लवकरच ही मालिका कलर्स मराठी वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

रश्मीचा आणि रेशमचा बऱ्याच काळाने कमबॅक

अभिनेत्री रश्मी अनपट बऱ्याच काळाने मालिकेत दिसणार आहे. रश्मी 'सन मराठी'वरील शाब्बास सुनबाई या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली. तिच्या या मालिकेने गेल्या वर्षी जुलैमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला. तर रेशम अबोली या मालिकेनंतर बऱ्याच महिन्यांनी प्रेक्षकांना नव्या मालिकेतून आणि भूमिकेतून पाहायला मिळणार आहे. अबोली या मालिकेत तिने साकारलेली विजया राजाध्यक्ष या वकिलाची निगेटिव्ह भूमिका खूप गाजली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'अटल सेतू' नंतर मुंबईत देशातील सर्वात लांब उड्डाणपूल बांधणार! पण कुठे अन् लांबी किती असणार? वाचा MMRDAचा नवा मास्टरप्लॅन

Women's World Cup: कसली, भारी इंग्रजी बोलते ही पोरगी! भारतीय महिलांनी वर्ल्ड कप जिंकला अन् Viral झाली ही... Video

'अमरेंद्र बाहुबली' री-रिलीज असूनही बाहुबली: द एपिकची रेकॉर्डब्रेक कमाई! प्रभासचा दबदबा कायम!

Mahur News : अचानक आलेल्या पुरातुन पर्यटक बालबाल बचावले....; नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील घटना

Stock Market Closing : शेअर बाजाराचा सपाट पातळीवर व्यवहार! पण Lenskart IPO ची मोठी मागणी! कोणते शेअर्स चमकले ?

SCROLL FOR NEXT