Renuka Shahane tweet went viral 
Premier

Renuka Shahane : 'मराठी लोकांना कमी लेखणाऱ्यांना मत देऊ नका'; त्या घटनेनंतर रेणुका यांनी व्यक्त केला संताप

Renuka Shahane post went viral : अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी मराठी लोकांचा अपमान करणाऱ्या लोकांना खडेबोल सुनावले आहेत. काय म्हणाल्या रेणुका जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. सगळे पक्ष त्यांचा पक्ष निवडून यावा म्हणून जोरदार प्रचार करत आहेत आणि मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी जनतेला आवाहन करत आहेत.

रेणुका यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांना मराठी लोकांचा अपमान करणाऱ्या उमेदवाराला मत देऊ नका असं आवाहन केलं आहे. " "मराठी not welcome" म्हणणार्‍या लोकांना कृपया मत देऊ नका 🙏🏽

मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका 🙏🏽

ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं, अशा लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका 🙏🏽

कुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध मी नाही, पण जे आपल्याच महाराष्ट्रात, आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाहीत, अशा लोकांना, शांतपणे, मत न देऊन, त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे 🙏🏽" असं ट्विट त्यांनी केलं आहे. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

रेणुका यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनेकांनी त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत त्यांच्या या बोलण्याला दुजोरा दिला आहे. अनेकांनी त्यांनी ही भूमिका घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण?

काही दिवसंपूर्वी सोशल मीडियावर एक जॉब पोस्ट व्हायरल झाली होती. या पोस्टमध्ये मराठी लोकांना हा जॉब दिला जाणार नाही असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे या प्रकरणामुळे सध्या सोशल मीडियावर वातावरण पेटलं आहे. या प्रकारानंतर अनेक दिग्गजांनी त्यांचा निषेध नोंदवला होता.

दरम्यान, रेणुका यांचे त्रिभंगा,  गोविंदा मेरा नाम हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस आले होते.या दोन्ही सिनेमातील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या होत्या. आता त्या आणखी कोणत्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहील आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

Gadchiroli Threat: एटापल्लीतील जेएसडब्ल्यू अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी; ‘लाल सलाम’ पत्रकामुळे गडचिरोलीत खळबळ

SCROLL FOR NEXT