Sharvari Wagh Esakal
Premier

Sharvari : आणि बाजीराव मस्तानीच्या सेटवर घडलेली 'ती' गोष्ट शर्वरीने सगळ्यांना सांगितली

Sharvari Wagh shared her favourite memory : अभिनेत्री शर्वरी वाघने तिच्या सुरुवातीच्या काळातील भन्नाट आठवण एका मुलाखतीमध्ये शेअर केली.

सकाळ डिजिटल टीम

Munjya : सध्या मुंज्या सिनेमामुळे अभिनेत्री शर्वरी वाघ चर्चेत आहे. तिचा हा नुकताच रिलीज झालेला हा सिनेमा सगळीकडे चांगलाच गाजतोय. सिनेविश्वात अभिनेत्री म्हणून काम सुरु करण्यापूर्वी शर्वरीने अनेक सिनेमांमध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं आहे. तिने बाजीराव मस्तानी या सिनेमासाठीही काम केलं आहे. नुकतंच एका मुलाखतीत तिने या सिनेमाची खास आठवण शेअर केली.

दीपिकाबरोबरची खास आठवण

शर्वरीने तिच्या करिअरच्या सुरुवातीला 'बाजीराव मस्तानी' सिनेमासाठी असिस्टंट दिग्दर्शक म्हणून काम करत होती. फिल्मीज्ञान सिनेमाला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितलं,"मी 'बाजीराव मस्तानी' सिनेमासाठी असिस्टंट दिग्दर्शक म्हणून काम करत होते. त्यावेळी दिवानी मस्तानी या गाण्याचं शूटिंग सुरु होतं आणि गाण्यात जी दीपिकाची मोठ्या दरवाजातून एंट्री होते तो दरवाजा एंट्री उघडण्याचं काम माझ्याकडे आणि आणखी एका असिस्टंटकडे होतं त्यावेळी दीपिका आमच्याबरोबर दरवाज्याजवळ उभी होती. तिला आम्हाला काहीतरी सूचना द्यायच्या होत्या पण त्यापूर्वी तिने आमच्या दोघांचीही नावं विचारून घेतली. खरंतर ही फार छोटी गोष्ट आहे कि ती आम्हाला असंच हाक मारून सूचना देऊ शकली असती पण तिने तसं केलं नाही. तिच्या या कृतीने आम्हीही तितकेच या सेटवर महत्त्वाचे आहोत याची जाणीव आम्हाला करून दिली. मी इतकी खुश झाले घरी गेल्यावर मी सगळ्यांना सांगितलं कि दीपिकाने आज मला माझं नाव विचारलं. "

शर्वरीची कारकीर्द

शर्वरीने 'फॉरगॉटन आर्मी' या वेबसिरीजमधून सिनेविश्वात पदार्पण केलं आणि त्यानंतर तिने 'बंटी और बबली २' या सिनेमात काम केलं. आता तिचा 'मुंज्या' हा सिनेमा रिलीज झालाय जो बॉक्स ऑफिस गाजवतोय. तर याच वर्षात तिचे 'महाराज' आणि 'वेदा' हे दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यापैकी 'वेदा' या सिनेमात ती अभिनेता जॉन अब्राहम बरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.

तर तिच्या वैयक्तिक आयुष्याबरोबर बोलायचं झालं तर शर्वरी विकी कौशलचा भाऊ सनी कौशलला डेट करत असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd ODI: रोहित शर्मा Is Best! सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली यांच्यानंतर परदेशात मैदान गाजवणारा तिसरा ओपनर

Maharashtra Politics : भेटींना राजकीय रंग देऊ नका; महायुती भक्कम असल्याचा कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांचा इशारा

Latest Marathi News Live Update : पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद, कारण काय?

RBI Rule: बँकेच्या चुकीमुळे तुमचे नुकसान झाले? मग ग्राहकांना मिळू शकते 33 लाखांपर्यंत नुकसान भरपाई; जाणून घ्या नियम

IND vs ENG: विराट मोडणार सचिन तेंडुलकरचा १९ वर्षांचा जुना रेकॉर्ड? जे कोणालाच जमलं नाही ते विराट करणार, पाहा नेमकं काय घडणार

SCROLL FOR NEXT