Sonakshi Sinha Post For Mother Esakal
Premier

Sonakshi Sinha : "आज मला त्यांची खूप आठवण येतेय..." ; लग्नानंतर पहिल्यांदाच सोनाक्षीची आई-वडिलांसाठी इमोशनल पोस्ट

Sonakshi Sinha Emotional Post : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने लग्नानंतर तिच्या आई-वडिलांसाठी पहिल्यांदाच इमोशनल पोस्ट शेअर केली.

सकाळ डिजिटल टीम

झहीर इकबालशी २३ जूनला लग्न केल्यानंतर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिचं लग्नानंतरचं आयुष्य एन्जॉय करतेय. लग्न ठरल्यापासून गेला बराच काळ सोनाक्षी चर्चेत होती. अनेकांनी तिच्यावर तिच्या लग्नाच्या निर्णयावरून टीका केली तर अनेकांनी तिच्या या निर्णयात तिची साथही दिली. सोनाक्षी आणि तिचे आई-वडील शत्रुघ्न आणि पूनम यांच्यात मतभेद असल्याचंही म्हंटलं जात होत पण नुकतंच तिने केलेल्या भावनिक पोस्टने या सगळ्या चर्चा धुळीस मिळाल्या आहेत.

सोनाक्षीची भावूक पोस्ट

लग्नानंतर पहिल्यांदाच सोनाक्षीने सोशल मीडियावर आई -वडिलांसाठी भावूक पोस्ट शेअर केली. त्यात ती म्हणते,"लग्नाच्या दिवशी जेव्हा माझ्या आईला जाणीव झाली कि आता मी हे घर सोडून जाणार तेव्हा ती रडू लागली तेव्हा मी तिला म्हणाले,"आई काळजी करू नकोस जुहू ते बांद्रा फक्त २५ मिनिटांचं अंतर आहे. आज त्यांची जरा जास्त आठवण येतेय आणि म्हणून मी आज स्वतःलाही हीच गोष्ट बोलून दाखवतेय. मला आशा आहे कि, रविवारी खास बनवलेली सिंधी कढी असेल...लवकरच भेटू... " सोशल मीडियावर तिची ही पोस्ट चर्चेत आहे.

सोनाक्षीच्या या पोस्टमुळे तिच्यात आणि तिच्या पालकांमध्ये दुरावा असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. तिने शेअर केलेल्या फोटोजमध्ये तिची आई पूनम तिला मिठी मारून रडताना दिसत आहेत. त्यांचे हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. अनेकांनी कमेंट करत सोनाक्षीला धीर दिला आहे.

सोनाक्षी ही शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांची धाकटी मुलगी आहे. तिला लव आणि कुश हे दोन जुळे भाऊ आहेत. सोनाक्षीच्या लग्नाला पूनम, शत्रुघ्न आणि कुशने हजेरी लावली होती पण लवने काही कारणामुळे लग्नाला हजेरी लावणं टाळलं पण त्याच नेमकं कारण समोर आलं नाहीये.

सोनाक्षी ही शत्रुघ्न यांची प्रेयसी रीना रॉय सारखी दिसते यावरूनही बरीच चर्चा झाली आहे. त्या दोघींच्या चेहऱ्यातील साम्यामुळे अनेक उलटसुलट चर्चाही झाल्या आहेत. यावर सोनाक्षीने स्पष्टीकरण देताना एका मुलाखतीत म्हंटल होतं कि,"ज्या काही घडल्या त्या जुन्या गोष्टी होत्या. त्याबद्दल मला काही बोलायचं नाही पण मी रीना रॉय नाही तर मी माझ्या आईसारखी दिसते." असं स्पष्टीकरण दिलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SAW vs BANW Live: दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली! भारताला स्पर्धेबाहेर फेकले? हरमनप्रीत कौरच्या संघाला एकच गोष्ट वाचवू शकते

CISF Bus Accident: कटरामध्ये CISF जवानांच्या बसला भीषण अपघात; ९ जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर, कशी घडली घटना?

Helicopter Crash: आक्रोश, धूर आणि मृत्यू... सौदी अरेबियात भीषण हेलिकॉप्टर दुर्घटना; अरामकोचे हेलिकॉप्टर कोसळून १४ जणांचा मृत्यू

Plane Crash : मोठी बातमी! फ्रान्समध्ये विमान कोसळलं, पाच विद्यार्थ्यांसह ११ जणांचा मृत्यू

IND vs IRE 2nd T20I : वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... भारतीय संघात दोन खेळाडूंचे पदार्पण; कोण आहेत ते? जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT