Paaru Serial Esakal
Premier

Paaru : पारू-आदित्यचं लग्न होणार पण...नव्या प्रोमोने प्रेक्षक नाराज

Paaru serial new twist : झी मराठीवरील पारू मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. पारू आणि आदित्यचं लग्न पार पडणार असून आदित्य पारूचं मन दुखावणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

झी मराठीवरील पारू ही प्रेक्षकांची लाडकी मालिका. पारू नावाच्या अल्लड, गोड मुलीची गोष्ट या मालिकेत पाहायला मिळते. किर्लोस्करांच्या घरी काम करणाऱ्या पारूने तिच्या वागणुकीमुळे सगळ्यांची मनं जिंकलीये. पारू मालिकेत आता आणखी नवीन ट्विस्ट येणार आहे.नुकताच या मालिकेचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला.

झी मराठीवर 'पारू' या मालिकेचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला. मालिकेच्या प्रोमोमध्ये पारू आणि आदित्यचं लग्न होतंय असं दाखवण्यात आलं. आदित्यशी लग्न होणार म्हणून पारू खुश असते पण जेव्हा आदित्य गळ्यात मंगळसूत्र घालतो तेव्हा हे एका अॅडचं शूटिंग असल्याचं पारूच्या लक्षात येतं. प्रॉडक्शन टीम पेरूचे सगळे दागिने काढून नेते पण मारू मंगळसूत्र देणार नाही असा निर्धार करते आणि हे लग्न खरं असल्याचं मानते असं प्रोमोमध्ये दाखवण्यात आलंय.

पहा प्रोमो:

अॅड शूट करण्यासाठी आदित्यने पारुशी लग्नाचं नाटक केलं असेल का? पारुला लग्न खोटं असल्याचं आदित्य समजावू शकेल का? मालिकेत आता काय ट्विस्ट येणार या सगळ्या प्रश्नांची उत्तर मालिकेच्या विशेष भागात मिळणार आहेत. 27 मे पासून संध्याकाळी 7:30 वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

मालिकेच्या प्रोमोवर प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. "पारूच्या बाबत असं व्हायला नको" असं काहींनी म्हटलंय तर काहींनी मालिकेचं कथानक सुधारण्याची मागणी केली आहे. तर काहींनी आदित्य आणि पारूचं खरोखर लग्न लावून द्या अशी मागणी केलीये.

मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. अहिल्यादेवींच्या आयुष्यात सूर्यकांत कदम या त्यांच्या दुश्मनाची पुन्हा एंट्री झालीये. सूर्यकांतने अहिल्यादेवींच्या नवऱ्याला किडनॅप केलं असून त्या बदल्यात अहिल्यादेवींकडे विचित्र मागणी केली आहे आणि आता अहिल्यादेवी त्यांच्या नवऱ्याला कसं सोडवणार हे पाहणं इंटरेस्टिंग असेल.

मालिकेत भरत जाधव सूर्यकांत कदम ही भूमिका साकारत असून बऱ्याच काळाने त्यांची मालिकाविश्वात पुन्हा एंट्री झालीये.

CSMT परिसरात मराठा आंदोलकाला हृदयविकाराचा झटका, बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी वाचवला जीव

Diabetes Control Tips: मधुमेहाला कायमच बाय- बाय म्हणायचं? मग लगेच या 6 गोष्टी सोडा; अन्यथा 5 अवयव होऊ शकतात खराब!

Fulambri News : प्रशांत नागरे यांच्या पुढाकाराने फुलंब्रीत नळकांडी पुलाचे स्वखर्चाने बांधकाम

Latest Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांची आरोग्य तपासणी सुरू

Satyanarayan Puja Special: सत्यनारायण पूजेसाठी खास! केळ, तूप, तुळस आणि वेलचीच्या सुवासातील गोड व सुगंधी प्रसादाचा शिरा

SCROLL FOR NEXT