colors marathi off air serial  sakal
Premier

'रमा राघव' आणि 'पिरतीचा वणवा...' पाठोपाठ कलर्स मराठीची आणखी एक मालिका घेणार निरोप तर 'सुख कळले'ची बदलली वेळ

Colors Marathi Serial Going Off Air : कलर्स मराठी वाहिनीवरील आणखी एक मालिका निरोप घेणार आहे. तर एका मालिकेची वेळ बदलली आहे.

Payal Naik

छोट्या पडद्यावर लवकरच 'बिग बॉस मराठी ५' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २८ जुलै रोजी रात्री ९ वाजता या कार्यक्रमाचा ग्रँड प्रीमिअर होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. मात्र त्यापूर्वी कलर्स मराठीवरील काही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर येतंय.यापूर्वी दोन मालिका निरोप घेणार होत्या अत्यंत आता तिसऱ्या मालिकेची भर पडली आहे. बिग बॉस मराठीसाठी या मालिका बंद करण्यात येत आहेत. तर काही मालिकांची वेळही बदलली आहे. काय असेल कलर्स मराठीवरील मालिकांचं नेमकं वेळापत्रक.

यापूर्वी कलर्स वाहिनीवरील 'पिरतीचा वणवा उरी पेटला' आणि 'रमा राघव' या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर आलं होतं. त्यात 'रमा राघव' ९. ३० वाजता तर 'पिरतीचा वणवा उरी पेटला' १० वाजता प्रक्षेपित करण्यात येत होती. आता या दोन्ही मालिका बंद होत आहेत. तर त्यांच्यापाठोपाठ ६. ३० वाजता दिसणारी लोकप्रिय मालिका 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेत आता बाळूमामा समाधी घेणार असल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे ही मालिका बंद होणार होणार आहे.

तर त्याजागी ९ वाजता प्रक्षेपित होणारी 'सुख कळले' ही मालिका आता ६. ३० वाजता दाखवण्यात येणार आहे. कलर्स मराठीच्या इंस्टाग्राम पेजवर ही माहिती देण्यात आली आहे. तर 'बिग बॉस मराठी ५' हा रात्री ९ वाजता भेटीला येईल अशी शक्यता आहे. यापूर्वीचे सीझन ९. ३० ते १०. ३० असे एक तास प्रक्षेपित होत होते. मात्र आता इतर मालिकांची बदललेली वेळ पाहता हा सीझन दररोज दिड तास दाखवण्यात येणार असल्याचा अंदाज बांधण्यात येतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: लग्नाआधीच वधू पळाली, नंतर बहीणीसोबत लग्न ठरवलं; पण तिचं भलतंच सत्य समोर येताच वर संतापला अन्... थरारक घटनेनं मंडपात खळबळ

वाईट ब्रेकअप होऊनही सचिन पिळगावकरांनी निभावलं एक्स गर्लफ्रेंडला दिलेलं वचन !

Karmala News: सावडीत धक्कादायक प्रकार; मानसिक आजारी व्यक्ती १२ वर्षांपासून साखळदंडात, मानवतेला फासला काळिमा..

Pune Crime: राज्यभर गाजलेल्या केडगाव प्रकरणात मोठी कारवाई; आणखी दोन डॉक्टरांवर गुन्हा, एक अटकेत

Dilip Walse Patil: मंचर परिसरात विद्यार्थ्यांसाठी फिनिशिंग स्कूल लवकरच सुरू होणार: दिलीप वळसे पाटील यांची घोषणा, केवळ गुण नव्हे, कौशल्यही महत्त्वाचे

SCROLL FOR NEXT