alana pandey became mother  sakal
Premier

Alanna Panday Baby: अनन्या पांडे झाली मावशी! अलाना पांडेने दिला गोंडस बाळाला जन्म, व्हिडिओ शेअर करत दाखवला चेहरा

Alanna Panday, Ivor McCray become parents: अनन्या पांडेची चुलत बहीण अलना पांडे आई झाली आहे. तिने एका मुलाला जन्म दिला आहे.

Payal Naik

अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे आई झाली आहे. अलानाने एका मुलाला जन्म दिला आहे. तिने पती इव्हर मॅकक्रेसोबतचा व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना तिच्या मुलाची झलक दाखवली आहे. अलानाचा बाळासोबतचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तिने चाहत्यांना बाळाचा चेहराही दाखवला आहे. चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

व्हिडिओ शेअर करताना अलानाने लिहिलं- आमचा छोटा देवदूत आला आहे. व्हिडिओमध्ये, अलानाचा पती येऊन बेडवर बसतो त्यानंतर अलाना येते तेव्हा तिच्या गोंडस मुलाला सोबत घेऊन येते.त्यानंतर ते दोघेही मुलाकडे पाहून हसतात आणि एकमेकांना किस करतात. या पोस्टवर चाहते कमेंट करत अलानाचं अभिनंदन करत आहेत. अनन्यानेदेखील तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर अलानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत तिने लिहिलं- माझा सुंदर मुलगा भाचा आला आहे. अनन्याचा आनंद तिच्या पोस्टमध्ये स्पष्ट दिसत आहे.

अलाना पांडे ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. इंस्टाग्रामवर तिचे 1.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. तिच्या मॅटर्निटी फोटोशूट आणि बेबी शॉवरचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. अलाना लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार आहे. तिचा रिॲलिटी शो द ट्राइब लवकरच प्राइम व्हिडिओ इंडियावर प्रदर्शित होणार आहे. या शोमध्ये भारतातील टॉप सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचं जीवन दाखवण्यात येणार आहे. या शोची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price Today: फक्त 'या' कारणांमुळे सोन्याचे भाव कोसळले; आज काय आहे 24 कॅरेचा भाव?

Monsoon Kitchen Care: पावसाळ्यात स्वयंपाकघरातील दमटपणा कमी करायचाय? मग 'या' गोष्टी नक्की करा

Khadakwasla Dam: 1961 चा महापूर… पण खडकवासला धरण वाचलं कसं? अज्ञात इतिहास वाचा

Rain-Maharashtra Latest live news update: NDA कडून सीपी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीचा अर्ज भरला

Asia Cup 2025 Explainer : श्रेयस अय्यरने आणखी काय करायला हवं? आगरकर म्हणाला, ना त्याची चूक, ना आमची...; मग दोष कुणाचा?

SCROLL FOR NEXT